महाराष्ट्रात दुष्काळ जाहीर होऊन अधिक काळ लोटला आहे. दुष्काळामुळे शेतीसाठी सोडा, पण पिण्याच्या पाण्याचा प्रश्न ही महाराष्ट्र्रात गंभीर होताना दिसत आहे. पाण्या अभावी पिकांचे नुकसान होत आहे, जनावरांसाठी चारा सुद्धा उपलब्ध नाही, शेतकऱ्यांना दिलेले कर्जमुक्तीचे आश्वासन अजून ही कागदावरच दिसत आहे. शेतकऱ्यांना नाइलाजाने आज पोटा-पाण्यासाठी शहरी भागात स्थलांतर व्हावे लागत आहे. इतका गंभीर प्रश्न, दुष्काळामुळे महाराष्ट्रात निर्माण झालेला दिसत असताना राजकीय नेत्यांना दुष्काळापेक्षा काही महिन्यावर येऊन धडकलेली निवडणूक अधिक महत्वाची वाटत आहे.
याला अपवाद ठरले ते शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे!
सध्या ते मराठवाडा भागातील नांदेड, परभणी, हिंगोली येथील दुष्काळग्रस्थ भागातील शेतकऱ्यांच्या भेटी घेत आहेत. या भागातील शेतकऱ्यांना पशु खाद्य वाटप, महिलांना साडी, विध्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप, युवकांसाठी शिबिराचे आयोजन केले जात आहे. दुष्काळामुळे खचून जाऊ नका शिवसेनेला हाक मारा. शिवसेना नेहमीच आपल्या पाठीशी आहे. असा धीर दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना देत आहेत. त्यात दुष्काळातील महिलांच्या हाताला रोजगार भेटावा, यासाठी शिवसेना आमदार डॉ. राहुल पाटील यांनी सूतगिरणी स्थापन केली. तसेच विजेची बचत व्हावी या उद्देशाने सदर सूतगिरणी ही सोलार पॉवरवर चालणारी आहे. या उपक्रमाचे आदित्य ठाकरेंनी आमदार पाटील यांचे कौतुक केले.