आमच्यासाठी पक्ष हेच कुटुंब तर काहींसाठी कुटुंब हाच पक्ष आहे, असा टोला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसला लगावला आहे. भाजप बुथ कार्यकर्त्यांशी संवाद साधताना ते बोलले आहेत.
प्रियांका गांधी यांची उत्तर प्रदेश काँग्रेसच्या पूर्व विभागाच्या सरचिटणीस पदावर नियक्ती झाल्यानंतर नरेंद्र मोदींनी प्रियांका गांधींच नावं न काँग्रेसवर निशाणा साधला आहे.
राहुल गांधी अपयशी ठरल्यानेच प्रियांका गांधींना काँग्रेसचं सरचिटणीस करण्यात आलं, अशी टीका भाजप प्रवक्ते संबित पात्रा यांनी केली आहे.
दरम्यान, प्रियांका गांधींकडे सोपवण्यात आलेल्या पूर्व विभागात नरेंद्र मोदी यांचा वाराणसी आणि योगी आदित्यनाथ यांचा गोरखपूर मतदारसंघ येतो.