Skip to content Skip to footer

वार्षिक ८ लाख उत्पन्न असणाऱ्यांना प्राप्तिकरात सूट – उद्धव ठाकरे यांची मागणी.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर पक्षाच्या सर्व खासदारांसोबत झालेल्या बैठकीत वार्षिक ८ लाख उत्पन्न असणाऱ्यांना प्राप्तिकरात सवलत देण्यात यावी अशी मागणी उद्धव ठाकरे यांच्या मार्फत करण्यात आली आहे. येत्या शुक्रवारी अंतरिम वर्षाचा अर्थसंकल्प मांडण्यात येणार असून, ही मागणी शिवसेना खासदार लोकसभेत मांडणार आहे. ज्याचे वार्षिक उत्पन्न ८ लाख रुपये आहे. ते करमुक्त करण्यात यावे. त्यावर कोणताही प्राप्तिकर आकारू नये,असे शिवसेनेने म्हटले आहे. शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी ही माहिती दिली आहे.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाच्या खासदारांची बैठक बोलावली होती. या बैठकीला पक्षाचे सर्व खासदार उपस्थित होते. या बैठकीनंतर संजय राऊत यांनी बैठकीत कोणत्या विषयावर चर्चा झाली, याची माहिती पत्रकारांना दिली आहे. ते म्हणाले, केंद्र सरकारने आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या सर्वांना नोकऱ्यांमध्ये १० टक्के आरक्षण लागू केले आहे. हे आरक्षण देताना ८ लाख रुपये वार्षिक उत्पन्नाची अट घालण्यात आली आहे. याचा अर्थ ८ लाख रुपये असलेली व्यक्ती गरीब आहे. मग आता वार्षिक ८ लाख रुपये उत्पन्न असणाऱ्यांना प्राप्तिकरात सवलत देण्यात यावी. तशी तरतूद आगामी अंतरिम अर्थसंकल्पात करण्यात यावी, अशी मागणी शिवसेनेची असल्याचे संजय राऊत यांनी सांगितले.
ही लक्ष्यवेधी मागणी लोकसभेत सर्व मताने मंजूर झाली तर, याचा फायदा देशातील ८ लाख उत्पन्न घेणाऱ्या सर्व जनतेला नक्कीच होईल असा विश्वास शिवसेनेला आहे. तसेच या बैठकीत महाराष्ट्रात पडलेला दुष्काळ, राफेल मुद्धा या सर्व विषयावर सविस्तर चर्चा झाल्याची माहिती मा. खासदार संजय राऊत यांनी दिलेली आहे.

Leave a comment

0.0/5