Skip to content Skip to footer

दुष्काळ ग्रस्तांच्या मदतीसाठी आदित्य ठाकरे यांचा जालना दौरा

काही दिवसावर येऊन राहिलेल्या लोकसभेच्या निवडणुकीमुळे सर्वत्र निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. कुठे जागा वाटपाची चर्चा तर कुठे युतीसाठी नेत्यांची पळापळ पण या सर्वांना अपवाद ठरले ते युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे, यंदाचा दुष्काळ ऑक्टोबर-नोव्हेंबर पासूनच भीषण होत चालला आहे. आग लागून पीके जळून जावीत, अशी अवस्था पीकांची झाली आहे. यापुढे आंदोलन पीकविमा आणि कर्जमुक्तीसाठी असेल असा खणखणीत इशारा आदित्य ठाकरे यांनी आपल्या परभणी दौऱ्यावेळी दिला होता. “मी एक शिवसैनिक म्हणून साहेबांच्या आदेशाने आपल्या मदतीला आलेलो आहे” या आदित्य ठाकरे यांच्या वाक्याने तिथे जमलेले सामान्य शेतकरी ही भारावून गेले होते.

जिथे इत्तर पक्षाच्या नेत्यांची मुले आपली लाइफ-स्टाइल जगण्यात व्यस्त आहे तिथे आदित्य ठाकरे एक शिवसैनिक म्हणून आज शेतकऱ्यांच्या मदतीला धावून जात आहे. कुठे आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना शेळ्या मेंढ्याचे वाटप, महिलांना स्वयंरोजगार उपलब्ध व्हावा यासाठी शिलाई मशीनचे वाटप, मोफत पोलीस भरती प्रशिक्षणासाठी निवड करण्यात आलेल्या १०० युवक युवतींना प्रशिक्षण सामुग्रीचे वाटप, जनावरांसाठी चारा छावणी या सर्व उपक्रमातून एक वेगळी छाप आदित्य ठाकरे महाराष्ट्र्राच्या राजकारणात आपली पाडत आहे. या कामामुळे आज सर्व स्थरातून आदित्य ठाकरे यांचे कौतुक होत आहे.

येत्या महिण्याच्या ३ तारखेला आदित्य ठाकरे यांच्या जालना दौऱ्याचे नियोजन करण्यात आलेले आहे. महाराष्ट्रातील शेतकरी दुष्काळाच्या सावटाखाली असताना त्याच्या हाताला काम भेटावे म्हणून ३००० शेतकऱ्यांना शेळ्या, मेंढ्या, गाई, म्हशी अनुदाना मार्फेत आदित्य ठाकरे यांच्या हस्ते वाटप करण्यात येणार आहे. तसेच ठीक-ठिकाणी शिवसेना तर्फे चारा छावण्या उभारण्यात येणार आहे. तसेच जनावरांसाठी ३२ गोशाळेची निर्मिती करण्यात येणार आहे. आज दुष्काळग्रस्थ भागातील लोकांना मुबल पिण्याचे पाणी भेटावे म्हणून ६ पाणी पुरवठा करणाऱ्या टॅंकरचा शुभारंभ आदित्य ठाकरे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. राजकारण फक्त मातांसाठीच केले जाते, पण ते राजकारण समाजकारणासाठी सुद्धा करू शकतो याची जाणीव आज आदित्य ठाकरे यांच्या कामातून महाराष्ट्र्राच्या जनतेला पुन्हा एकदा दिसून आले.

Leave a comment

0.0/5