मुंबई | लोकसभा निवडणुकीत भाजप 5 विद्यमान खासदारांना उमेदवारी नाकारण्याची शक्यता आहे, अशी माहिती समोर येत आहे. भाजप राज्यात लोकसभेच्या 25 जागा लढवणार आहे.
किरिट सोमय्या यांना शिवसेनेचा प्रखर विरोध असल्यानं त्यांना मुंबई उत्तर पूर्व मधून उमेदवारी नाकारली जावू शकते.
सोलापूरचे खासदार शरद बनसोडे, अहमदनगरचे दिलीप गांधी, पुण्याचे अनिल शिरोळे आणि लातुरचे सुनील गायकवाड यांनादेखील मतदारसंघात प्रभावी कामगिरी नसल्यानं उमेदवारी नाकारली जावू शकते.
दरम्यान, भाजप 25 जागांवर तर शिवसेना 23 जागांवर निवडणूक लढणार आहे.