मराठी भाषेला अभिजात दर्जा द्या- खा. राहुल शेवाळे यांची लोकसभेत मागणी

rahul-shewale-राहुल शेवाळे
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याची भूमिका शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांनी लोकसभेत मांडलेली आहे. त्यामुळे शिवसेनेचे मराठी भाषेवरील प्रेम पुन्हा एकदा समोर आले आहे.

आपले मत मांडताना मराठी भाषेत सुरवात करून शेवाळे म्हणले की, भारतातील वैशिष्ट पूर्ण भाषेला केंद्र शासनाच्या वतीने अभिजात दर्जा बहाल करण्यात येतो. मराठी भाषेला अभीजात दर्जा भेटावा म्हणून महाराष्ट्र शासन प्रयत्न करत आहे. केंद्र शासनाने आजवर तामिळ, संस्कृत, मल्याळम, तेलगू, ओरिसा या भाषांना अभिजात दर्जा केंद्र शासनाने दिलेला आहे.
शेवाळे म्हणाले, या अभिजात दर्जा मिळालेल्या भाषेच्या सर्वांगीण विकासासाठी केंद्र शासनाच्या वतीने अनुदान मिळते. भाषेची प्रतिष्ठा वाढते, राज्यपालाची अधिकृत मोहर उठते व भाषेच्या विकास कार्यास अधिक चालना मिळते.

मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा म्हणून सखोल संशोधन व अभ्यास करण्यासाठी शासनाने दि. १० जानेवारी २०१२ रोजी प्रा. रंगनाथ पाठारे यांच्या अध्यक्षतेखाली अभिजात मराठी भाषा समितीची स्थापना केली होती. सदर समितीने १८-३-२०१२, १४-८-२०१२ आणि १२-३-२०१३ ची मुदत वाढ देऊन ३१-२-२०१३ ला अहवाल सादर करण्यास सांगितले होते. समितीने १२-७-२०१३ रोजी मराठीत आणि १६-८-२०१३ रोजी इंग्रजीत केंद्र शासनाकडे अहवाल सादर केलेला आहे. भाषेची अभिव्यक्ता आणि मौलिकता पाहून मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्यात यावा असे मत परखडपणे खा. राहुल शेवाळे यांच्या कडून लोकसभेत मांडण्यात आलेले आहे.

महाराष्ट्रात झीरो आणि पाकिस्तानात हिरो…..

आज, मुंबईत आणि महाराष्ट्रात मराठी भाषेचा टक्का कमी होत आहे आणि ही चिंतेची बाब आहे. आज मराठी भाषा टिकण्यासाठी शिवसेना सर्वतोपरी प्रयत्न करताना दिसतच आहे. म्हणूनच, आज राहुल शेवाळे यांनी मांडलेल्या मराठीच्या प्रश्नामुळे सर्व स्थरातून राहुल शेवाळे यांचे कौतुक होत आहे. यावर शिवसेनेचे सर्व खासदार मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा म्हणून शर्तीचे प्रयत्न करतील असे ही शिवसेने कडून सांगण्यात येत आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here