Skip to content Skip to footer

आता चूक करायची नाही, आता बारामतीमध्ये फक्त कमळ : देवेंद्र फडणवीस

पुणे – आगामी लोकसभा निवडणुकीत भाजप महाराष्ट्रातील सर्वच्या सर्व 48 जागांवर लढणार आहे. मागच्या लोकसभा निवडणूकीत महाराष्ट्रात 42 जागावर विजय मिळवला होता यावेळी 43 जागावर विजय मिळवू आणि 43 वी जागा ही बारामतीची असेल, असे वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.

ते पुण्यातील भाजपच्या बूथ प्रतिनिधी मेळाव्यात बोलत होते. या मेळाव्यास भाजपचे अध्यक्ष अमित शहा, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे उपस्थित होते. भाजप आगामी निवडणूकीत राज्यात पूर्ण ताकतीने सर्व जागांवर लढणार असल्याचे सांगत मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेसह सर्व विरोधी पक्षांना आव्हान दिले आहे.

पुण्यातील तिन्ही मतदारसंघात फक्त कमळच फुलणार. आता चूक करायची नाही आता बारामतीमध्ये फक्त कमळ, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. बारामती मतदार संघातून सध्या सुप्रिया सुळे या खासदार आहेत, आणि बारामती हा शरद पवार यांचा बोलकिल्ला समजला जातो.

यावेळी देशात पुन्हा काँग्रेसची सत्ता आल्यास ही देशातील जनतेची ऐतिहासिक चूक असेल. मनमोहन सिंग सरकारच्या काळात निर्णयचं घेतले जात नव्हते, मात्र भाजप सरकारच्या काळात लोकांच्या हितांचे निर्णय घेण्यात आले, असं म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काॅंग्रेस-राष्ट्रवादीवर घाणाघती टीका केली.

मोदींनी 21 वे शतक भारताच्या नावे केले. कारण नरेंद्र मोदी एक क्षणही वाया घालवत नाही. असं देखील देवेंद्र फडणवीस म्हणाले.

Leave a comment

0.0/5