Skip to content Skip to footer

मागील 13 वर्षात राहुल गांधींच्या संपत्तीत 16 पटीने वाढ – एडीआर

असोशिएशन फॉर डेमोक्रॅटीक रिफॉर्मस (एडीआर)ने नुकताच खासदार आणि आमदारांच्या संपत्तीबाबतचा अहवाल प्रसिद्ध केला असून उत्तर प्रदेशात सगल तीनवेळा खासदार, आमदार म्हणून निवडणून आलेल्यांच्या संपत्तीत मोठी वाढ झाल्याची माहिती समोर आली आहे. उत्तर प्रदेशातील 2004 ते 2017 या कालावधीतील विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांच्या निकालांच्या आधारे हा अहवाल तयार करण्यात आला आहे. उत्तर प्रदेशतील आमदार आणि खासदारांच्या संपत्ती आणि इतर गोष्टींची माहिती यामध्ये देण्यात आली आहेत.

235 खासदारांच्या शपथपत्रावरून समजते की प्रत्येक खासदारांची सरासरी संपत्ती 6 कोटी एवढी आहे. सलग तीनवेळा खासदार झालेल्यांच्या संपत्तीतही मोठी वाढ झाली आहे. काँग्रेसचे खासदार राहुल गांधींची संपत्ती यात 55 लाखांवरून जवळपास 10 कोटी म्हणजेच 16 पट वाढली आहेत. तर सपा नेते मुलायमसिंह यादव यांच्या संपत्तीत 13 पट आणि माजी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या संपत्तीतही 10 पट वाढ झाली आहे. भाजप खासदार आणि केंद्रीय मंत्री मेनका गांधी यांच्याही संपत्तीत 5 पट वाढ झाली आहे.

एडीआरच्या अहवालानुसार, उत्तर प्रदेशातील आमदार आणि खासदारांपैकी 38 टक्के नेते गुन्हेगारी पार्श्वभूमीचे असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. यातील 23 टक्के नेत्यांवर खून, दंगल, खूनाचा प्रयत्न, बलात्कार यांसारख्या गंभीर गुन्ह्यांचा आरोप आहे. तर पुन्हा पुन्हा निवडून येणाऱ्या खासदार, आमदारांच्या संपत्तीत महामूर वाढ झाली असल्याचेही या अहवालात नमूद करण्यात आलं आहे.

एडीआरने हा अहवाल 2004 ते 2017 या कालावधीत निवडणूक लढणारे उमेदवार, आमदार आणि खासदार यांच्या पार्श्वभूमीचा अभ्यास करून सादर केला आहे. या अहवालानुसार गेल्या 13 वर्षात लोकसभा-विधानसभा निवडणुकीत बहुजन समाजवादी पार्टीने सर्वाधिक 59 टक्के कोट्याधीशांना उमेदवार म्हणून उभा केले. त्याखालोखाल समाजवादी पक्ष 55 टक्के, भाजप 52 टक्के तेर काँग्रेसने 42 टक्के उमेदवार कोट्याधीश होते. जिंकणाऱ्या खासदार आणि आमदारांमध्ये भाजपचे सर्वाधिक 73 टक्के खासदार, आमदारांचा समावेश आहे.

Leave a comment

0.0/5