Skip to content Skip to footer

मनसेचा एकमेव आमदार शिवसेनेच्या वाटेवर !

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे, कारण, नगरसेवकांपाठोपाठ आता मनसेचे एकमेव आमदार शरद सोनावणे सध्या शिवसेनेच्या वाटेवर असून आज जुन्नरचे आमदार शरद सोनावणे मनसेला रामराम ठोकून शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता आहे.

जुन्नरचे एकमेव आमदार शरद सोनावणे यांनी 2014 च्या विधानसभा निवडणुकीत मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या बुडत्या नौकेला वाचवले होते. पण ती नौकाही आता बुडण्याच्या मार्गावर आहे. शरद सोनावणे समर्थकांसह मातोश्रीवर दाखल झाले असून ते आजच शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे म्हटले जात आहे.

दरम्यान, आमदार शरद सोनावणे यांना पक्षात घेण्यास शिवसैनिकांचा तीव्र विरोध असल्याचे वृत्त आहे. शिवसैनिक बाहेरचा उमेदवार स्वीकारणार नाही, अशी भूमिका जुन्नर तालुक्यातील सर्व पदाधिकाऱ्यांनी घेतली आहे. आमची भूमिका ऐकून न घेता शरद सोनावणे यांना उमेदवारी दिली तर तालुक्यातील सर्व पदाधिकारी आपापल्या पदाचा सामूहिक राजीनामा देतील, असा इशाराही दिल्याची चर्चा आहे.

Leave a comment

0.0/5