छत्रपती संभाजी महाराज फेम डॉ अमोल कोल्हे यांनी शिवसेना पक्षाला सोडचिट्टी देऊन राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला आहे. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीला राष्ट्रवादी स्टार प्रचारक म्हणून निवडणुकीला डॉ. कोल्हे यांचा वापर करणार असेच आज चित्र महाराष्ट्रात दिसून येत आहे. त्याची प्रचिती आज पिपरी-चिंचवड मध्ये दिसून सुद्धा आलेली आहे. लोकमतदार संघात कोल्हे यांच्या स्वागताचे फलक लावताना त्यांच्या छत्रपती संभाजी महाराज यांच्या वेशभूषा मधील फोटो वापरण्यात आलेला असून त्यामुळे कुठेतरी महाराष्ट्रातील शिवप्रेमीची मने दुखावलेली आहे. असेच दिसून येत आहे. त्या बद्दल एका शिव प्रेमीने फोन करून डॉ. अमोल कोल्हे यांना या प्रकाराचा जाब विचारला आहे.
जातीचे राजकारणात कधीही न करणे हीच बाळासाहेबांची शिकवण- खा. आढळराव पाटील
नमस्कार मी स्वप्नील यादव बोलतोय असे बोलून कोल्हे यांचे राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केल्यामुळे यादव यांनी कोल्हे यांचे पहिले अभिनंदन केले आणि पुढे म्हणाले मी तुमच्या अभिनयाचा चाहता आहे. एक सल्ला दयायचा होता देऊ शकतो कां यावर कोल्हे यांनी होकार दिल्यावर पुढे यादव बोलले की, मी आता एक बॅनर पहिला पिपरी-चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा स्टार प्रचारक अमोल कोल्हे यांचे पिपरी-चिंचवड येथे सहर्ष स्वागत ५ मार्च, त्या फलकात तुमचा संभाजी महाराज वेषभूशा असलेला फोटो लावलेला आहे. त्यावर कोल्हे म्हणले मी सगळयांना सांगून ठेवलेले आहे महाराजांच्या गेट-अप मधला फोटो वापरू नका म्हणून यावर यादव म्हणले की आम्ही अमोल कोल्हे यांना अभिनेता म्हणून पाहतो ठीक आहे आपण शिवसेनेतून राष्ट्रवादीत गेला आहे पण तिथे आपल्या महाराजांच्या वेषभूशा मधला आपला फोटो नको. आता निवडणुका येत आहे थोडेशे कायकर्ते मूर्ख असतात पण आपली वैचारिक पातळी कमी झाली का असेच वाटते त्यावर अमोल कोल्हे यांनी उत्तर न देता फोन बंद केला होता.
स्वप्नील यादव यांनी डॉ.अमोल कोल्हे यांना त्यांची चूक लक्षात आणून दिलेली आहे. आज छत्रपती संभाजी महाराज यांच्या वेशभूषा मधील फोटो वापरून राष्ट्रवादीचे माजी आमदार विलास लांडे मतांचे राजकारण करून पाहत आहे. आधी स्वतःचे नाव शिरूर मतदार संघातून जाहीर करून आज डॉ. अमोल कोल्हे यांच्या नावाचे फलक लावून कुठेतरी लांडे पक्षांतर्गत गटबाजी करत असताना दिसत आहे. आज डॉ. कोल्हे यांचा सुद्धा राजकारणासाठी राष्ट्रवादी वापर करून घेत आहे. परंतु या राजकारणात कोल्हे यांनी केलेल्या भूमिकांचा आणि राजकारणाचा काहीही संबंध नाही आहे हे जनतेला माहित आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात जनता डॉ. अमोल कोल्हे यांना स्वीकारणार नाही हेच चित्र दिसून येईल असेच बोलले जात आहे.