Skip to content Skip to footer

अजितदादा पवार आणि महसूल मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्यातील वाद वाढणार?

अजितदादा पवार आणि महसूल मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्यातील वाद सर्वांना माहितीच आहेत, येणाऱ्या निवडणुकीला राष्ट्रवादी आणि भाजपा पक्षातील वाद अजून वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या दोन्हा पक्षांच्या नेत्यांनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप चालू केले आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील वातावरण निवडणुकीच्या काळात चांगलेच तापू लागले आहे. सीएम चषकाच्या बक्षीस सभारंभाच्या कार्यक्रमावेळी शरद पवार हे रविवारचे पंतप्रधान आहेत. कारण रविवारी सुट्टी असते. दोनचा आकडा खासदारकीला गाठता येत नाही आणि पंतप्रधान बनण्याचे स्वप्न बाळगतात. असे बोलून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उघड-उघड राष्ट्रवादीला आव्हानच दिले होते. आता त्यात भर म्हणून मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी शरद पवार यांचे वय झाले आहे त्यांनी निवडणूक लढवू नये, त्यांचा पराभव होईल असा सल्लाच शरद पवार यांना चंद्रकांत पाटील यांनी दिलेला आहे.

https://maharashtrabulletin.com/politics/2019/03/07/%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A4%A4%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A5%80%E0%A4%B0-%E0%A4%AD%E0%A5%81%E0%A4%9C%E0%A4%AC%E0%A4%B3-%E0%A4%AF/

पाटील यांच्या वक्तव्याचा खरपूस समाचार राष्ट्रवादीचे माजी मंत्री अजित पवार त्यांनी घेतलेला आहे. कोल्हापूरचे पालक मंत्री चंद्रकांतदादा पाटील हे स्वप्नात असल्‍यासारखे बडबडत आहेत. तुमच्यात हिंमत असेल तर माढ्यातून लढाच.

तुम्हाला चितपट केलं नाही तर नावाचं सांगणार नाही शरद पवार हे देशासाठी निवडणूक रिंगणात उतरत आहेत अशावेळी चंद्रकांतदादा पाटील बावचळल्या सारखे बडबडत आहेत. त्यांनी पहिला आपली पाटीलकी सांभाळावी असं खुलं आव्हान राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी मंत्री पाटील यांना दिले आहे.

त्यामुळे येणाऱ्या दिवसात अजितदादा पवार आणि चंद्रकांतदादा पाटील यांच्यातील वाद अजून वाढण्याचे चिन्ह दिसून येत आहे. या प्रकरणावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी बोलणे टाळले आहे.

Leave a comment

0.0/5