लोकसभेच्या निवडणुकी बरोबरच येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुका एकत्र घेण्याचा निर्णयावर शासन विचार करत आहे.
त्यासाठी उदया तातडीची राज्यमंत्री मंडळाची बैठक बोलावण्यात आलेली आहे. या बैठकीला विधानसभा बर्खास्थ करण्याच्या निर्णय घेण्यात येऊ शकतो अशी माहिती समोर येत आहे.
या संदर्भात निर्णय घेण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेणार असल्याचे वृत्त सुद्धा समोर येत आहे. मागील चार दिवसात राज्य शासनाकडून अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात येणार असल्याचे बोलले जात आहे.
उद्या घेण्यात येणाऱ्या कॅबिनेट मंत्री मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे. येणाऱ्या ८ दिवसात लोकसभेची तारीख जाहीर होत असताना तत्पूर्वी विधानसभा बर्खास्थ करून या दोन्ही निवडणुका एकत्र घेण्याच्या चर्चेला उधाण आले आहे.
यावर युतीत असलेल्या शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे काय निर्णय घेतात या निर्णयाकडे सुद्धा सर्वांचे लक्ष लागले आहे. या निर्णया नंतर काँग्रेसचे प्रवक्ता सचिन सावंत यांनी सुद्धा या गोष्टीला दुजोरा देत एकत्र निवडणुका झाल्या तर आम्ही या निवडणुकासाठी तयार आहे असे बोलून दाखविले.