Skip to content Skip to footer

समीर भुजबळ यांचा स्वीकार नाशिकची जनता करेल का?

काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी जाहीर झाल्यानंतर, राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांनी नाशिक जिल्हा दौरा केला होता. शरद पवारांनी दोन्ही काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना एकदिलाने भाजपा विरोधात लढण्याचे आवाहन केले खरे पण, नाशिकचा उमेदवार कोण असणार हे काही सांगितलंच नाही.

छगन भुजबळांच्या भाषणाचा संपूर्ण फोकस हा मात्र, फक्त समीर भुजबळ वरच होता. त्यामुळे येणाऱ्या आगामी लोकसभेच्या निवडणुकीला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे छगन भुजबळ यांचे नाव जाहीर करणार की, समीर भुजबळ यांच्या नावाला पसंदी दर्शवतात हे अजून सुद्धा गुलदस्त्यातच आहे.

अमरावती येथे दिव्यांगांना शिवसेना खा. अडसूळ यांच्या मार्फत ३ कोटीचे साहित्य वाटप.

 

छगन भुजबळ आपल्या भाषणात म्हणले की, समीर जेलमध्ये माझ्यासोबत नसता तर मी जिवंत बाहेर आलोच नसतो, असं सांगून भुजबळांनी कार्यकर्त्यांना पुरतं भावनिक करून टाकले होते.

नाशिक लोकसभा उमेदवार पवार जाहीर करतील ही अपेक्षा सगळ्यांना होती. मात्र, पवारनीती ही संकेत देणारी ठरली. त्यामुळे शरद पवारांनी कार्यकर्त्यांना पुन्हा जोमाने कामाला लागण्यासाठी घेतलेली बैठक खरोखर फलदायी ठरणार का? ही सुद्धा चर्चा सुरू झाली आहे.

नाशिकची जनता छगन भुजबळ यांच्या जागी समीर भुजबळ यांचा येणाऱ्या लोकसभा निवडणुकीला पक्षाचा उमेदवार म्हणून स्वीकार करणार किंवा नाही यावर सुद्धा प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे.

Leave a comment

0.0/5