Skip to content Skip to footer

आता काँग्रेस पक्षा बरोबर चर्चा नाही – प्रकाश आंबेडकर

आता काँग्रेस बरोबर कोणत्याही प्रकारची चर्चा होणार नाही तसेच महाराष्ट्रातील सर्व जागा आम्ही लढवणार असा निर्णय वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी घेतलेला आहे. त्यामुळे काँग्रेस राष्ट्रवादी पक्षाच्या अडचणीत वाढ झालेली दिसून येत आहे. दोनच दिवसापूर्वी प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेसचे उमेदवार माजी मंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या विरोधात दंड थोपटून सोलापूर मतदार संघातून निवडणुकीला उतरणार असल्याचे जाहीर केले होते. त्यामुळे आगामी लोक सभेला शिंदे यांच्या पुढे नवीनच पेच-प्रसंग निर्णय झालेला होता. सोलापुरातून आपली उमेदवारी घोषित करून काँग्रेस पक्षाला जाहीर आव्हानच आंबेडकर यांनी दिले आहे.

दिल्लीत महत्वाची बैठक सुरू; आजच महाराष्ट्रातील काँग्रेसचे उमेदवार ठरणार

काँग्रेस ही वंचित आघडीला महाआघाडीत घेण्यासाठी आधीच उस्सुक असताना दिसत होती. या साठी अशोक चव्हाण, छगन भुजबळ, माणिकराव ठाकरे आणि समीर भुजबळ यांनी मुंबई येथे प्रकाश आंबेडकर यांच्या घरी जाऊन बोलणी सुद्धा केली होती. परंतु या चर्चेतून काहीही मार्ग निघालेला नव्हता. त्यानंतर आंबेडकर यांनी १२ जागेची मागणी काँग्रेस पक्षाकडे केलेली होती. त्यात बारामती, सोलापूर या जागेचा सुद्धा समावेश होता. परंतु या चर्चे मधून काहीही मार्ग निघालेला नव्हता. आता वंचित आघाडी काँग्रेस पक्षा बरोबर कसलीही चर्चा न करता येणारी निवडणूक स्वबळावर लढणार असे जाहीर करून टाकले आहे. त्यामुळे काँग्रेस पक्षाला येणाऱ्या निवडणुकीच्या तोंडावर अडचणीत भर पडलेली दिसत आहे.

Leave a comment

0.0/5