Skip to content Skip to footer

सुजय विखेंच्या भाजपप्रवेशावर पत्नी धनश्री यांची प्रतिक्रिया

मोदी-शहांच्या भाजपला पराभूत करण्यासाठी सर्व शक्तीनिशी मैदानात उतरलेल्या काँग्रेसला आज महाराष्ट्रात मोठा दणका बसला. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांचे चिरंजीव सुजय यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.

सुजय विखे भाजपात तर राधाकृष्ण विखेंच राजीनामा नाही!

सुजय विखे यांचा भाजप प्रवेशाचा सोहळा फडणवीस यांच्या उपस्थितीत आज मुंबईत पार पडला. काँग्रेस-राष्ट्रवादीला धक्का देत भाजपमध्ये प्रवेश करणारे सुजय विखे-पाटील यांचं लोकसभेचं तिकीट पक्कं आहे, असे संकेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिले. ‘सुजय यांचं नाव लवकरचं भाजपच्या संसदीय समितीकडं पाठवण्यात येईल,’ अशी माहिती फडणवीस यांनी आज दिली.

दरम्यान, सुजय यांच्या प्रत्येक निर्णयामागे मी खंबीरपणे त्यांच्या पाठीशी आहे, अशी प्रतिक्रिया सुजय विखे पाटील यांच्या पत्नी धनश्री विखे पाटील यांनी दिली. सुजय यांच्या भाजप प्रवेशानंतर त्या म्हणाल्या की, निर्णय प्रक्रियेतही मी त्यांच्यासोबत आणि सहमत होते.मला कधी त्यांना राजकीय सल्ला देण्याची गरज पडली नाही. पण प्रत्येक निर्णय आम्ही चर्चा करुन घेत असतो.माझ्यापेक्षा त्यांना आई-वडिलांचा सल्ला अधिक मोलाचा आहे.घरात फार राजकीय चर्चा करणं टाळतो. सुजय यांच्या प्रचारात मी काम करणार आहे असं देखील त्या म्हणाल्या.

Leave a comment

0.0/5