Skip to content Skip to footer

युतीची पहिली सभा छत्रपती शाहू महाराज यांच्या नगरीत

आगामी लोकसभा निवडणुकीचा रूपरेषा ठरवण्यासाठी मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांनी मातोश्री येथे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांची भेट घेतलेली होती या भेटी दरम्यान शिवसेना-भाजपा युतीची पहिली जाहीर सभा छत्रपती शाहू महाराज नगरीत म्हणजे कोल्हापुरात येणाऱ्या २४ मार्चला होणार आहे. मंगळवारी मध्यरात्री उशीरापर्यंत शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये मातोश्रीवर बैठक रंगली होती. या बैठकीत युतीच्या जगांबाबत चर्चा देखील झाली. केंद्रीय निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या आणि सर्व राजकीय पक्षाची एकच लगबग सुरू झाली आहे.

लोकसभा Election 2019 : सांगा नेटिझन्स… यंदा लाट कोणाची?

 

कोल्हापुरात शिवसेना पक्षातर्फे प्रा. संजय मंडलिक आणि धैर्यशील माने हे निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे. मंडलिकांच्या विरोधात राष्ट्रवादीचे खा. धनंजय महाडिक निवडणुकीला उभे राहणार आहे. परंतु महाडिकांच्या विरोधातच काँग्रेस माजी मंत्री सतेज पाटील यांनी संजय मंडलिकांना निवडून आणण्याचे ठरविले आहे त्यामुळे मंडलिक हेच कोल्हापूरचे २०१९ ला खासदार असतील अशीच चर्चा सध्या कोल्हापुरात रंगत आहे. तसेच कोल्हापुरात एकूण ५ आमदार हे शिवसेना पक्षाचे असल्यामुळे साहजिकच मंडलिक आणि धैर्यशील माने हे कोल्हापूर जिल्ह्यचे नवे खासदार असतील अशी चर्चा कोल्हापुरात खेडेगावातील पारावर रंगत असताना दिसत आहे.

मंत्री चंद्रकांतदादा पाटील हे युतीचे कोल्हापुरातील तगडे पालकमंत्री आणि वजनदार नेते असल्यामुळे जिल्यात याचा सुद्धा फायदा युतीच्या उमेदवारांना होणार आहे. राज्यात सेना-भाजप युतीच्या ज्या काही सभा होणार आहेत त्यापैकी काही सभांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे एकाच व्यासपीठावर दिसतील. आता मोदींचा सहभाग असणाऱ्या सभा नेमक्या कुठे आणि कधी ठेवायच्या यावर विचार सुरु आहे. पंतप्रधान मोदी यांच्या वेळापत्रकानुसार या सभा ठरवल्या जाणार आहेत. असे भाजपा नेत्याकडून सांगण्यात येत आहे. प्रचाराच्या सुरुवातीलाच युतीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांचे एकत्र मेळावे घेण्याचे ठरविले आहेत. येत्या १५, १७ आणि १८ मार्च रोजी हे मेळावे राज्यात सहा जिल्ह्यांत होणार आहे. तसेच पदाधिकाऱ्यांच्या या मेळाव्यांनंतर महाराष्ट्रातील युतीचा सर्वात मोठा महामेळावा आयोजित केला जाणार आहे.

Leave a comment

0.0/5