टीम महाराष्ट्र देशा : युती झाल्याने आघाडीच्या तुलनेत सेना आणि भाजपचे पारडे जड झालं आहे. बदललेली राजकारणातील हवा लक्षात घेवून अनेक नेते सेना-भाजपमध्ये प्रवेश करतील अशी शक्यता निर्माण झाली आहे. नुकताच सुजय विखे यांचा भाजप प्रवेशाचा सोहळा फडणवीस यांच्या उपस्थितीत मुंबईत पार पडला.त्यावरून भाजपवर‘पोरं पळवणारी टोळी अशी उपरोधिक टीका विरोधकांकडून होत आहे. उद्धव यांनी तोच धागा पकडून ‘सामना’च्या अग्रलेखातून भाजपला सावध केले आहे.
शिवसेना-भाजपा युती न झाल्यास भाजपाचा लोकसभेला दारुण पराभव..?
‘महाराष्ट्रात काँग्रेसनं राजकीय घराणी निर्माण केली आहेत. वारा येईल तशी पाठ फिरवणारी ही घराणी आहेत. उद्या शिवसेनेचा मुख्यमंत्री असेल तेव्हा ही घराणी शिवसेना भवनाच्या रांगेत असतील. भाजपनं ही काळजी घ्यायला हवी. भाजप किंवा शिवसेना काँग्रेसवाल्यांसाठी हक्काचे ‘पाळणाघर’ होऊ नये,’ असा सल्ला शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपला दिला आहे.