Skip to content Skip to footer

आता तेवढं शरद पवार यांना भाजपात घेऊ नका – उद्धव ठाकरे

आजकाल कोणावर टीका करायची म्हणजे भीती वाटते. उद्या तो भाजपा नाहीतर शिवसेनेत असायचा असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बोलून दाखविले आहे. यावेळी त्यांनी मुख्यमंत्र्यांना आता तेवढे शरद पवारांना भाजपात घेऊ नका असे म्हणत चिमटा काढला. युती झाल्यानंतर पहिल्यांदाचा अमरावतीत शिवसेना – भाजपा युतीचा महामेळावा पार पडला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उपस्थित होते. कोणावर टीका करायची म्हणजे पंचायत होते. उद्या शिवसेना नाही तर भाजपात असायचा. एक विनंती आहे आता शरद पवारांना भाजपात घेऊ नका. नाही तर निवडणुकीत गंमत येत नाही. थोडी तरी लोक समोर ठेवा. सगळेच आपल्या पक्षात आले तर बोलायचे कोणावर असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.

आगामी लोकसभा निवडणुकीची पहिली शिवसेना-भाजपा पक्षाची सभा अमरावती जिल्ह्यात पार पडलेली आहे. या सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी युती बद्दल बोलताना “ही युती म्हणजे ‘फेविकॉलचा मजबूत जोड’, तो तुटणार नाही” अश्या शब्दात युतीचे कौतुक सुद्धा केले होते. यावेळी उद्धव ठाकरेंनी युतीवर भाष्य केले. वाद असले तरी कधीही आपला संघर्ष राज्याच्या हिताआड येऊ दिला नाही असे सांगताना उद्धव ठाकरेंनी नरेंद्र मोदींचेही कौतुक केले. अजूनही मी त्यांना नरेंद्रभाई म्हणतो. आपला भाऊ वाटावा अशी व्यक्ती देशाच्या पंतप्रधानपदी असल्याचा अभिमान आहे असं उद्धव ठाकरेंनी यांनी सांगितले.

पुढे सोशल मीडियावर आणि मीडिया चॅनेलवर दाखवण्यात येणाऱ्या पोल बद्दल पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आपले मत मांडताना बोलले की, सर्व्हे म्हणजे अंतिम नाही. माझा त्याच्यावर विश्वास नाही, आत्मविश्वास हाच माझा विश्वास आहे असे यावेळी उद्धव ठाकरेंनी सांगितले. महाराष्ट्रात ४८ जागा आपल्याला कमी पडतील असे सांगताना सर्व जागा आपणच जिंकल्या पाहिजेत असे उद्धव ठाकरे बोलले आहेत.

Leave a comment

0.0/5