१३ मार्च रोजी मुंबईत येथे पार पडलेल्या वर्धापन दिन सोहळ्याला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे येणाऱ्या आगामी लोकसभा निवडणुकी संदर्भात काहीतरी घोषणा करतील अशीच चर्चा रंगत होती. परंतु त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना जरा सबुरी घेण्याचा सल्ला दिलेला होता. आता येणाऱ्या १९ मार्चला राज ठाकरे लोकसभा संदर्भात मोठी घोषणा करणार असल्याचे बोलून दाखविले आहे. त्यामुळे साऱ्या महाराष्ट्राचे आणि मनसेच्या कार्यकर्त्यांचे लक्ष १९ तारखेला राज ठाकरे काय बोलणार याकडेच लक्ष लागलेले आहे. हा सस्पेन्स १९ मार्चला राज ठाकरे हे राष्ट्रवादी पक्षाला पाठिंबा देण्याच्या तयारीत आहेत का ? असा अंदाज सुद्धा वर्तवला जात आहे.
मंगळवार अर्थात १९ मार्चला रंगशारदा मंगल कार्यलयात राज ठाकरे काय बोललात याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. राज ठाकरे यांनी महाराष्ट्रातल्या मनसेच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना रंगशारदा या ठिकाणी बोलावलं आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकांबाबत ते काय भूमिका घेणार हे पहाणे महत्त्वाचे ठरणार आहे. २०१४ मध्ये राज ठाकरेंनी लोकसभा निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेत नरेंद्र मोदींना पाठिंबा देण्याचा निर्णय जाहीर केला होता. आता त्या निर्णयाच्या अगदी परस्पर विरोधी निर्णय राज ठाकरे जाहीर करण्याची शक्यता आहे.
९ मार्च मनसेच्या वर्धापन दिन सोहळ्याला राज ठाकरे यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली होती. तसेच भाजपा अध्यक्ष अमित शाह आणि भाजपाच्या अनेक निर्णयावरही टीका केली. त्यामुळे १९ मार्चला होणाऱ्या मेळाव्यात राज ठाकरे राष्ट्रवादी काँग्रेसला पाठिंबा जाहीर करतील आणि नरेंद्र मोदींविरोधात प्रचार करतील अशी शक्यता वर्तवली जाते आहे. नेमके काय होणार याचा सस्पेन्स त्याच दिवशी संपणार आहे. लोकसभा निवडणुकांच्या तारखा गेल्या रविवारीच जाहीर करण्यात आल्या. त्यानंतर आत्तापर्यंत राज ठाकरे यांनी काहीही भूमिका घेतली नाही त्यामुळे मनसे कार्यकर्ते काहीसे संभ्रमात असल्याचं चित्र आहे. ही बाब लक्षात घेऊन राज ठाकरे आपली भूमिका जाहीर करण्याची शक्यता आहे.