Skip to content Skip to footer

विलास लांडे यांचा पत्ता कट, खासदार अढळराव पाटील यांचा विजय निश्चित?

राष्ट्रवादी पक्षाने आपली दुसरी यादी जाहीर केली आहे. त्या यादीत मावळ मतदार संघातून अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांचे नाव जाहीर करण्यात आलेले आहे आणि शिरूर मतदार संघातून सिनेस्टार अमोल कोल्हे यांचे नाव जाहीर करण्यात आलेले आहे. परंतु मागील दोन वर्षा पासून शिरुर मतदारसंघात लोकसभेची तयारी करणारे माजी आमदार विलास लांडे यांना डावलण्यात आलेले आहे. विलास लांडे यांच्या जागी शिवसेना पक्षातून राष्ट्रवादी पक्षात काही दिवसापूर्वी प्रवेश करणारे शिवसेना पक्षाचे बंडखोर डॉ. अमोल कोल्हे यांचे नाव यादी मध्ये समाविष्ठ करून माजी आमदार लांडे यांच्यावर अन्याय करण्यात आलेला आहे. त्यामुळे नाराज राष्ट्रवादीचे कार्यकर्ते कोल्हे यांना मदत करतील का यावरच सध्या प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

या निवडणुकीमध्ये मावळ आणि शिरूर हे दोन मतदार संघ चांगलेच चर्चेत राहिले आहेत. या दोन मतदार संघातून राष्ट्रवादी कोणाला संधी देणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागून होते. पण आज राष्ट्रवादीने जाहीर केलेल्या दुसऱ्या यादी मध्ये मावळ आणि शिरूर या दोन मतदारसंघाचा तिढा सोडवला आहे. दरम्यान शिरूर मतदार संघातून राष्ट्रवादी कडून विलास लांडे यांच्या नावावर पक्ष श्रेष्ठींकडून शिक्कामोर्तब करण्यात आले होते. पण अमोल कोल्हे यांची लोकप्रियता बघून राष्ट्रवादीने अमोल कोल्हे यांना शिरूर मतदार संघाची जबाबदारी दिली गेलेली आहे. त्यामुळे शिरूर मतदार संघातील राष्ट्रवादीचे निष्ठावंत कार्यकर्ते यांनी आपली नाराजी राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांकडे बोलून दाखवलेली आहे.

अमोल कोल्हे या बाहेरच्या नवख्या उमेदवारांच्या प्रचाराला शिरूर मतदार संघातील राष्ट्रवादी पक्षाचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरणार नाही अशीच परिस्थिती दिसून येत आहे. एकवेळेस खा. शिवाजीराव अढळराव पाटील पुन्हा खासदार म्हणून चालतील पण बाहेरचा कोल्हे नको असे उघड-उघड राष्ट्रवादीचे कार्यकर्ते बोलून दाखवत आहे. अजित पवार यांच्या सभेला सुद्धा लांडे सामर्थकांनी घोषणा देऊन कोल्हे यांच्या नावाला विरोध केला होता. त्यामुळे शिरूर मतदार संघात तयार झालेले वातावरण हे खा. पाटील यांच्या विजयासाठी पूरक आहे आणि खा. शिवाजीराव अढळराव पाटील पुन्हा खासदारकी जिंकणार असेच सध्या मतदार संघात सर्वच पक्षाचे नेते बोलून दाखवत आहे.

Leave a comment

0.0/5