Skip to content Skip to footer

राज्यात मतदार नोंदणीत महिलांची आघाडी….

मतदार नोंदणीत महाराष्ट्रातील तरुणांचा पुढाकारउल्लेखनीय असून राज्यातील ११ लाख ९९ हजार ५२७ तरूण मतदार प्रथमचमतदानाचा हक्क बजावणार आहेत.मतदार नोंदणीमध्ये राज्यात महिला मतदार आघाडीवर आहेत. राज्यातीलपुरुष व महिला मतदारांचे प्रमाण एक हजार पुरुष नोंदणीकृत मतदारामागेनोंदणीकृत ९११ महिला मतदार असे आहे. राज्यातएकूण ८ कोटी ७३ लाख २९ हजार ९१० नोंदणीकृत मतदार आहेत. यापैकी ४ कोटी ५७ लाख १ हजार ८७७ पुरुष तर ४ कोटी १६ लाख २५ हजार ९५० महिला मतदार आहेत.राज्यात २ हजार ८३ नोंदणीकृत तृतीयपंथी मतदार आहेत. एक हजार लोकसंख्येमागे मतदार नोंदणीचे प्रमाणही राज्यात उल्लेखनीय आहे.राज्यात एक हजार लोकसंख्येमागे ७१० नोंदणीकृत मतदार आहेत. तर राज्यातएकूण ४८ लोकसभा जागांसाठी चार टप्प्यात एकूण ९५ हजार ४७५ मतदानकेंद्रावर मतदान घेण्यात येणार आहे..

केंद्रीय निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या आकडेवरीत ही माहिती पुढे आलीआहे. महाराष्ट्रासह देशात होऊ घातलेला लोकशाहीचा सर्वोच्च उत्सव १७ व्यालोकसभेच्या निवडणुकीत सहभागी होण्यासाठी महाराष्ट्रातील मतदार सज्ज झालेआहेत. महाराष्ट्रात मतदारांची एकूण संख्या ८ कोटी ७३ लाख २९ हजार९१० आहे. राज्यात १८ ते १९ वर्ष वयोगटात अर्थात प्रथमच मतदारम्हणून नोंदणी करणाऱ्या तरूणांची संख्या ११ लाख ९९ हजार ५२७ आहे. हे तरुणप्रथमच लोकसभा निवडणुकीसाठी मतदानाचा हक्क बजावणार आहेत.देशात १८ ते १९ वर्ष वयोगटातील मतदारांची एकूण संख्या १ कोटी ५० लाख ६४ हजार ८२४ आहे.

देशाचे पंतप्रध नरेंद्र मोदी यांनी सुद्धा आपल्या ट्विटरवरून आपल्या सर्व विरोधकांना आव्हानंच केले होते. राहुल गांधी, ममता बॅनर्जी, शरद पवार, अखिलेश यादव, तेजस्वी यादव आणि एम के स्टॅलिन यांनी आगामी लोकसभा निवडणुकीत मतदारांचा जास्तीत जास्त सहभाग वाढवण्यासाठी प्रोत्साहन द्यावं असं मी त्यांना आवाहन करतो,’ असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व विरोधकांना उद्देशून ट्वीट केलं आहे. मागील काही वर्षा पासून देशात मतदान करणाऱ्या मतदारांचा टक्का कमी झलेला आहे आणि ही चिंतेची बाब आहे. भारतीय संविधानाने आपल्याला दिलेल्या मतदानाचा अधिकार आपण बाजवलाच पाहिजे असे ही मोदी यांनी ट्विट केले होते.

Leave a comment

0.0/5