Skip to content Skip to footer

राष्ट्रवादी पक्षाला नगर मध्ये उमेदवारच मिळेना

सुजय विखे पाटील यांनी भाजपा मध्ये प्रवेश केल्यावर अख्या महराष्ट्रातील वातावरण ढवळून निघाले होते. सुजय विखे पाटील यांनी नगर मतदार संघातून महाआघाडी कडून निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यासाठी बरेच प्रयत्न केले होते. परंतु राष्ट्रवादीचे शरद पवार यांनी ही जागा काँग्रेस पक्षाला म्हणजे विखे पाटील यांच्या मुलाला सोडण्यासाठी पवार तयार झालेच नव्हते तसेच आमच्याकडे नगर लोकसभा मतदार संघासाठी उमेदवार असल्यामुळे आम्ही राष्ट्रवादीच्या त्या उमेदवारावर अन्याय करू शकत नाही. असे शरद पवार यांनी बोलून सुद्धा दाखविले होते. परंतु राष्ट्र्वादीने नगरच्या जागेवर अद्याप उमेदवार जाहीर केलेला नाही आहे.

शरद पवार यांनी राधाकृष्ण विखे पाटील आणि पवार परिवारातील जुने विषय काढून पुन्हा एकदा पवार आणि विखे पाटील यांच्यातील जुने वाद उकरून काढले आहेत. त्यामुळे मी राष्ट्रवादीच्या उमेदवारांच्या प्रचाराला जाणार नाही असे सुद्धा विखे पाटील यांनी पक्षाच्या प्रमुखांना कळविले होते. आज राष्ट्र्वादी मागील दोन ते तीन वेळा ह्या जागेवर उमेदवार उभे करून हार पदरात पाडून घेत आहे. आज सुजय विखे पाटील यांच्या दांडग्या लोक सहवासामुळे आणि दोन वर्षांपासून करत असलेल्या नगर मधील लोक कामामुळे ही जागा सहजच काँग्रेस जिंकून आली असतीच असे मत सुद्धा काँग्रेस महाराष्ट्र अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी व्यक्त केले होते.

तर दुसरीकडे भाजपातील प्रवेश सोहळा उरकल्यापासून, डॉ. सुजय विखे यांनी शिवसेना-भाजपा नेत्यांच्या भेटींचा धडाका लावला. शिवसेनेचे प्रमुख प्रमुख उद्धव ठाकरे, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, विधानसभेचे उपाध्यक्ष विजय औटी, शिवसेना उपनेते अनिल राठोड, माजीमंत्री बबनराव पाचपुते यांच्या भेटी घेत त्यांनी चर्चाही केली आहे. त्यामुळे ही जागा साहजिकच सुजय विखे पाटील जिंकणार असेच बोलले जात आहे. परंतु महाआघाडीची हातातील एक जागा कमी झालेली आहे असे सुद्धा बोलले जात आहे. आज उमेदवार आहे म्हणूनच नगरची जागा सुजयला नकार देणाऱ्या राष्ट्रवादीचा खोटेपणा पुन्हा एकदा समोर आलेला आहे.

Leave a comment

0.0/5