आज राष्ट्रवादी पक्षात खरे बोलण्या पेक्षा खोटे बोलण्यावरच जास्त भर दिली जात आहे. आधी सुजय विखे पाटील आणि आता राष्ट्रवादीचे जुने कट्टर समर्थेक विजयसिंह मोहिते पाटील यांनी घड्याळाची साथ सोडून हातात कमळ घेतलेले आहे. माढा लोकसभा मतदारसंघातून विजयसिंह मोहिते पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवार निश्चित केली होती. मात्र, त्यांचा आग्रह दुसऱ्या व्यक्तीला उमेदवारी देण्याचा होता. त्या व्यक्तीच्या उमेदवारीला माळशिरस मतदारसंघ वगळता इतर पाच विधानसभा मतदारसंघातून विरोध होता. त्यानंतरही आम्ही विजयसिंह मोहिते पाटलांशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला, मात्र, त्यांनी आपला मोबाईल बंद ठेवून निर्णय घेतला, असे स्पष्टीकरण राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी दिले.
आज सुजय विखे पाटील आणि विजयसिंह मोहिते पाटील यांच्या उमेदवारी बद्दल अजित पवार खोटे बोलत आहे असेच दिसून येते. सुजय विखे पाटील यांनी राष्ट्रवादी कडून नगर जिल्ह्यात निवडणूकीच्या रिंगणात उतरण्यासाठी तिकीट मागितलेली होती. परंतु शरद पवार आणि अजित पवार यांच्या नगर जिल्ह्याच्या राजकारणामुळे सुजय यांना नाइलाजाने भाजपा पक्षात प्रवेश करावा लागला होता. पुढे शरद पवार यांच्या सारख्या वरिष्ठ नेत्याने विखे पाटील यांच्या वडिलांचा विषय काढून टीका केली होती. हे एका वरिष्ठ नेत्याला न पटणारे कृत्य शरद पवार यांनी केले होते आणि आता विजयसिंह मोहिते पाटील यांनी सुद्धा भाजपा पक्षात प्रवेश केला होता.
अजित पवार यांनी विजयसिंह मोहिते पाटील यांच्या उमेदवारी बद्दल चर्चा करताना आपण त्यांचा तिकीट देणार होते पण त्यांनी फोन बंद केला होता असे धडधडीत खोटे अजित पवार हे सभेला बोलून दाखवत होते जर मोहिते पाटलांना तिकीट देणार होता तर त्यांनी पक्ष का सोडला आणि त्यांचे नाव राष्ट्रवादी पक्षाच्या पहिल्या यादीत का जाहीर केले नाही हे प्रश्न आज भाजपा आणि मोहिते पाटील यांचे खंदे समर्थक अजित पवारांना विचारत आहे. पार्थ पवार यांचे नाव जर आपल्या पहिल्या यादीत जाहीर होत असेल तर विजयसिंह मोहिते पाटील यांचे नाव का जाहीर केले नाही त्यामुळेच अजित पवार हे धडधडीत खोटे बोलताना दिसून येत आहे.