Skip to content Skip to footer

लोकसभेला पराभव झाल्यास महाडिकांचे राजकारण संपुष्ठात येईल

कोल्हापूर लोकसभा मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार धनंजय महाडिक यांचा पराभव झाल्यास जिल्ह्यात महाडिक गटाचे राजकारण संपणार असल्याची भीती माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी व्यक्त केली. ते खुपिरे ता.करवीर येथे कार्यकर्त्यांशी बोलत होते. चांगले काम करूनही या निवडणुकीत खासदार महाडिक यांच्या विरोधात वातावरण तयार झाले आहे. त्याचा अंदाज आल्याने अजून निवडणुका महिनाभर लांब असतानाच महाडिक गटाचे नेते आणि माजी आमदार महाडिक यांनी ही भीती व्यक्त केली आहे. लोकसभेत पुतण्याचा पराभव झाला तर कोल्हापूर जिल्हा दूध संघाची ची सत्ता ही जाईल, असेही भाकीत त्यांनी केले आहे.

कोल्हापूर शहरात महादेव महाडिक यांच्याच घरात खासदार, आमदार आणि जिल्हापरिषद अध्यक्ष अश्या तीन सत्ता एकाच घरात आहे. महादेव महाडिकांचे पुतणे राष्ट्रवादी पक्षातून खा.धनंजय महाडिक हे कोल्हापूर शहराचे विघमान खासदार आहे. इतर दोन सदस्य हे आमदार आणि जिल्हा परिषदेवर भाजपा पक्षातून पदावर आहे. मागील विधानसभा निवडणुकीतील गटबाजीमुळे कोल्हापूर शहरातील तगडे वजनदार नेते सतेज पाटील यांनी उघड-उघड शिवसेना पक्षाचे उमेदवार प्रा, संजय मंडलिक यांना निवडणूक आणण्याचे ठरविले आहे. त्यामुळे राष्ट्रवादी पक्षाचे उमेदवार खा. महाडिक यांच्या पुढे अडचन निर्माण झालेली आहे.

आज कोल्हापूर शहराची परिस्थिती पाहता कोल्हापूर राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी शरद पवार यांना महाडिक यांच्या विरोधात तक्रार करून धनंजय महाडिक हे विरोधी पक्षाला मदत करतात अशी तक्रार करण्यात आलेली होती. परंतु राष्ट्र्वादीने धनंजय महाडिक यांना पुन्हा उमेदवारी देऊन राष्ट्रवादी पक्षाचे कागल आणि आसपासच्या गावातील कार्यकर्त्यांना नाराज केले होते. त्यामुळे ही फळी महाडिकांना मदत करणार का अशीच शंका सध्या कोल्हापुरात निर्माण झालेली आहे. या घडलेल्या सर्व घडामोडीमुळे महाडिकांना आपला पराजय दिसून येऊ लागला आहे. या पराजयातूनच लोकसभेला धनंजय महाडिक यांचा पराभव झाला तर कोल्हापूरातून महाडिकांचे साम्राज्य संपुष्ठात येईल असे माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी बोलून दाखविले आहे.

Leave a comment

0.0/5