Skip to content Skip to footer

मावळ मतदार संघात लढत पवार विरुद्ध बारणे

आगामी लोकसभा निवडणुकीला शिवसेना पक्षाने आपले २१ उमेदवार जाहीर केले आहेत. त्यात उमेदवारी यादीत ९ खासदारांना पुन्हा खासदारकीची संधी देण्यात आलेली आहे. परंतु खरा सामना रंगणार आहे तो अजित पवार यांचे पुत्र पार्थ अजित पवार आणि मावळ मतदार संघातून श्रीरंग बारणे यांच्यात सामना रंगणार आहे. श्रीरंग बारणे यांनी २०१४ च्या निवडणुकीत शेकापचे उमेदवार लक्ष्मण जगताप यांचा १ लाखांपेक्षा अधिक मताधिक्याने पराभव केला होता. या निवडणुकीत श्रीरंग बारणे यांच्या समोर आव्हान जरी नवख्या उमेदवाराचे असले तरी त्या उमेदवाराच्या कुटुंबाचा राजकारणातील व्यास मोठा आहे. त्यामुळे ही लढत बारणेंसाठी आव्हानात्मक असणार आहे.

खासदार श्रीरंग बारणे यांना काही दिवसापूर्वी संसदरत्न या पुरस्करणारे गौरविण्यात आले होते. आता संसदरत्न हा पुरस्कार बारामतीत विकत तर भेटत नाही. देशातील आपल्या मतदार संघात चांगले काम करणाऱ्या खासदारालाच या पुरस्कारने गौरविण्यात येत असते. काही दिवसापूर्वी शरद पवार यांनी पार्थ यांची उमेदवारी नाकारली होती परंतु आपल्या नातवाच्या हट्टापायी पुन्हा त्यांना आपल्या निर्णयावर विचार करण्यास भाग पाडून पार्थ पवार यांना उमेदवारी देण्यात आलेली होती. पार्थ पवार यांना आपल्या पहिल्या भाषणात धड मराठी सुद्धा वाचता आलेले नाही तर देशाच्या विविध मतदार संघातील खासदारान समोर पार्थ पवार काय बोलणार असेच प्रश्न सध्या मावळ मतदार संघातील जनतेला पडलेला आहे..

आज खरी लढत ही मावळ मतदार संघात घराणेशाही विरुद्ध संसदरत्न खासदार यांच्यात खरी लढत आहे. मावळच्या खालच्या भागातील म्हणजेच कर्जत , उरण , पनवेल या भागात जयंत पाटील यांच्या शेतकरी कामगार पक्षाचे चांगलेच वर्चस्व असल्याने तसेच कॉंग्रेस – राष्ट्रवादी आणि इतर पक्ष यांची महाआघाडी असल्यामुळे मावळ मधून पार्थ पवार यांना फायदा होण्याची शक्यता आहे. हे सगळे सत्य असले तरी मागील १५ ते २० वर्षापासून काँग्रेस-राष्ट्र्वादीने केली जनतेची आणि शेतकऱयांची पिळवणूक केलेली अजून सुद्धा लोक विसरलेली नाही आहेत आणि पुन्हा एकदा घराणेशाहीला महाराष्ट्रातून जनता हद्दपार करेल असेच चित्र दिसून येणार आहे.

Leave a comment

0.0/5