Skip to content Skip to footer

खात्यात १५ लाख आणि २ लाख नोकऱ्या मिळाल्या का – नारायण राणे

आज भाजपा पक्षाला घरचा आहेर मिळाला आहे असेच बोलले जाते. खात्यात १५ लाख आणि २ लाख नोकऱ्या मिळाल्या का? असा सवाल स्वाभिमानी पक्षाचे नेते आणि भाजपा कोट्यातून खासदार झालेले नारायण राणे यांनी भाजपा सरकारला विचारला आहे. आपण भाजपा सोबत राहणार म्हणणारे नारायण राणे दुसरीकडे भाजपावर टीका करताना दिसत असल्याचीही विरोधकांमध्ये चर्चा आहे. ‘धोका करू नका,जे हवं ते मागा पण सूर्याजी पिसाळ होऊ नका’, अशी कळकळीची विंनती नारायण राणे यांनी बूथ कार्यकर्त्याना केली आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणूक स्वतंत्रपणे लढण्याची घोषणा नारायण राणे यांनी आधीच केली होती.

आज पाच वर्षातच भाजपाची ही अवस्था झाली आहे. यांचे खासदार, आमदार पालकमंत्री तोंड उघडतात का? लोकांना विचारा असेही नारायण राणे यावेळी भाजपा पक्षावर हल्लाबोल केला . स्वतंत्र निवडणूक लढवण्याची घोषणा नारायण राणेंनी याआधी केली होती. पण भाजपसोबत जवळीक वाढल्यानंतर ते भाजपचे खासदार झाले. तसेच भाजपच्या जाहीरनामा कमिटीचे राणे सदस्य सुद्धा आहेत. परंतु युती करताना शिवसेनेचा याला विरोध होता. आता युतीही झाल्याने राणेंची कोंडी झाली आहे. गेल्या चार वर्षांपासून एकमेकांवर टीका करणाऱ्या शिवसेना आणि भाजपाची युती होताच राणेंचा पत्ता आपोआपच कट झाल्याची चर्चा आहे.

सिंधुदुर्ग-रत्नागिरी मतदारसंघातून चिरंजीव नीलेश राणे यांना तर औरंगाबाद येथून सुभाष किसनराव पाटील हे स्वाभिमान पक्षाकडून लोकसभा लढवणार आहेत. परंतु भाजपा विरोधात उमेदवार देणार नाही असे काही दिवसापूर्वीच राणे यांनी जाहीर केले होते. परंतु आता भाजपावर हल्लाबोल केल्यामुळे राणे यांनी काँग्रेस पक्षा बरोबर साटेलोटे तर जमले नाही ना असाच प्रश्न सध्या भाजपा पक्षतील नेत्यांना पडलेला आहे. त्यामुळे नारायण राणेंच्या या निर्णयावर भाजपा पक्ष काय कारवाही करते किंवा त्यांना खासदारकीचा राजीनामा देण्यास भाग पडते हे येणाऱ्या दिवसात समोर येईल.

1 Comment

  • Datta
    Posted March 23, 2019 at 8:22 pm

    Tumhi kont tir marla mahit ahe na sarvanna, tumchya bolnyala kahi arth asel as vatat nahi

Leave a comment

0.0/5