माझा पक्षात कोणीच ऐकत नाही – अशोकराव चव्हाण

अशोक चव्हाण| No one in my party listens - Ashokrao Chavan

माझं पक्षात कोणीच ऐकायला तयार नाही. त्यामुळे मला महाराष्ट्र्र प्रदेश काँग्रेस अध्यक्ष पदाचा राजीनामा द्यावासा वाटतो असे मत अशोक चव्हाण यांनी बोलून दाखविले होते. सध्या ती क्लिप सोशल मीडियावर चांगलीच वायरल होत आहे. चंद्रपूर लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारीवरून काँग्रेसमधील राजकारण चांगलेच तापले आहे. आधी विशाल मुत्तेमवार यांचे नाव घोषित होवून ते मागे पडले. आता विनायक बांगडे यांना उमेदवारी जाहीर झाली. अशोक चव्हाण शिवसेनेचे आमदार बाळू धानोरकर यांच्यासाठी आग्रही होते. त्यांनी काँग्रेस प्रवेशासाठी आमदारकी आणि पक्षाचा राजीनामा दिला होता.

अध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या सांगण्यावरून आमदार धानोरकर यांनी राजीनामा दिला होता. मात्र ते उमेदवारी देवू शकले नाही. त्यामुळे माझे कुणीच ऐकायला तयार नाही. त्यामुळे मलाच प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा द्यावासा वाटत आहे, अशा शब्दात त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. बांगडे यांची उमेदवारी घोषित झाल्यानंतर जिल्हाभरातील काँग्रेस कार्यकर्त्यांनी अशोक चव्हाण यांच्याशी संपर्क साधला आणि तीव्र नाराजी व्यक्त केली. एका कार्यकर्त्याशी बोलताना त्यांनी आपलीच मानसिकता राजीनामा देण्याची असल्याचे सांगितले. या संभाषणाची क्लिप सध्या प्रसार माध्यमावर चांगलीच वायरल होत आहे.

काँग्रेसने रात्री उशिरा ३५ उमेदवारांची यादी जाहीर केली. यात राज्यातील ५ नावांचा समावेश आहे. काँग्रेसने या यादीत चंद्रपूरमधून विनायक बांगडे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. काँग्रेसने चंद्रपूरमधून विशाल मुत्तेमवार यांच्या ऐवजी विनायक बांगडे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. बांगडे यांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर कॉंग्रेस कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पहायला मिळत आहे. याच मुद्द्यावरून कॉंग्रेसमध्ये नाराजी वाढत आहे. एका कार्यकर्त्याने चव्हाण यांच्याशी संपर्क साधला असता चव्हाण यांनी आपल्या भावना बोलून दाखवल्या .या कथित वक्तव्याची क्लिप ऐन निवडणुकीच्या तोंडावर व्हायरल झाल्याने काँग्रेस पक्षाच्या गोटात खळबळ उडाली आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here