पार्थला सल्ला देणार नाही, ठेच लागली की शहाणा होईल – शरद पवार

शरद पवार | Partha-Advice-Provide-No

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी आपली उमेदवारी मागे घेऊन मावळ मतदार संघातून अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांची उमेदवारी जाहीर केलेली होती. पार्थ पवार यांच्या पहिल्या निवडणुकीच्या सभेला पार्थ पवार यांना धड मराठीत लिहिलेले वाचता सुद्धा आले नव्हते. त्यामुळे पार्थ यांचे भाषण संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेच्या करमणुकीचा विषय पार्थ पवार झालेले होते. त्यातच शरद पवार यांनी मुलांना सल्ले देऊ नये, चालताना ठेच लागली की ते आपोआप शिकतात, शहाणे होतात असे मत शरद पवारांनी व्यक्त केले होते. त्यामुळे शरद पवार यांचा पार्थ यांच्या उमेदवारीला विरोध होता हे आता समोर आलेले आहे.

राष्ट्रवादीने त्यांना मावळमधून उमेदवारी दिली. एकाच घराण्यातल्या किती जणांनी उभे राहायचे असे म्हणत पवारांनी निवडणुकीतून माघार घेत असल्याचे जाहीर केले होते. त्यामुळे पार्थ पवार यांच्याबद्दल सगळ्यांना उत्सुकता निर्माण झाली. तरुणांना सल्ले देत न राहता त्यांना त्यांच्या मनाप्रमाणे पुढे जाऊ दिले पाहिजे असे म्हटले जाते. तेच तत्व पाळत असल्याचे शरद पवारांनी दाखवून देत पार्थला एक प्रकारे सावधगिरीचा सल्ला दिला. त्याचबरोबर पुढे जाताना अडथळे येतात त्यातून शिकायचे असते हेही सांगत सार्वजनिक जीवनात कितीही टीका झाली तरी आत्मविश्वास टिकवून ठेवायचा असतो हेही वडिलकीच्या नात्याने सांगितले.

शरद पवार यांनी पार्थ आपल्या नातवाच्या हट्टापायी मावळ मतदार संघातून तिकीट दिले होते. परंतु मावळ मतदार संघातील राजकीय परिस्थितीचा अंदाज शरद पवार यांना आधीपासूनच आहे. म्हणूनच त्यांनी पार्थ यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यासाठी पवार विरोध करत होते. पार्थ यांच्या विरोधात शिवसेना पक्षाचे खासदार श्रीरंग बारणे हे उमेदवार असणार आहेत. काही दिवसापूर्वी बारणे यांच्या कामगिरीमुळे त्यांना संसदरत्न पुरस्कारने सम्मानित करण्यात आलेले होते. त्यामुळे बारणे समोर एक नवखा उमेदवार टिकू शकत नाही याची कल्पनाच शरद पवार यांना आलेली होती.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here