नगर मतदार संघातील भाजपचे उमेदवार सुजय विखे यांना पक्षामध्ये घेऊन काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला खिंडार पाडण्यास सुरुवात केली. आघाडीला पडलेले भूकंपाचे धक्के हे दिल्लीच्या तख्तापर्यंत गेल्याने आघाडी हतबल झाली, अशी टीका करुन आता कुणाची यंत्रणा याचा विचार न करता तीनही यंत्रणा म्हणजे, भाजप-सेना-विखे एकत्र आल्याने विखेंना सर्वाधिक मतांनी निवडून आणणारच असा निर्धार पालकमंत्री राम शिंदे यांनी आपले मत व्यक्त केले आहे.
पालकमंत्री राम शिंदे म्हणाले, काँग्रेस राष्ट्रवादीला मोठ्या प्रमाणात धक्के बसले आहे. मोहिते-पाटील सुद्धा आता भाजपात आले आहे. राज्यात व देशात वातावरण बदल झाला आहे. त्यामुळे सर्वांच्या लक्षात आलेला आहे. भूकंपाचे लहरी दिल्लीच्या तख्तापर्यंत पोहोचले आहेत. आता काँग्रेस-राष्ट्रवादी मेटाकुटीला आले आहे. या निवडणुकीमध्ये केंद्र व राज्य सरकारने केलेल्या योजना लोकांपर्यंत पोहचवून देशात पुन्हा भाजपाची सत्ता आणुन नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करायचे आहे, त्यासाठी सर्वांनी एक दिलाने काम करा. कोणाच्या यंत्रणेची कोणाला गरज आहे, नाही हे पाहू नका. तिन्ही यंत्रणा एकत्र आलेल्या आहेत.
नगर मध्ये घडलेल्या सर्व घडामोडीमुळे भाजपाचे नवनिर्वाचीत उमेदवार सुजय विखे पाटील हे भारी बहुमताने निवडणून येणार हेच परिस्थिती सध्या नगर मध्ये दिसून येत आहे. ही झालेली युती म्हणजे राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाच्या महाआघाडीला घाम फुटणार आहे असे सुद्धा राम शिंदे यांनी बोलून दाखविले होते,