Skip to content Skip to footer

५६ लोक एकत्र जमलेत परंतु हातात हात अन तंगड्यात तंगड-उद्धव ठाकरे

शिवसेना-भाजपा युतीची पहिला जाहीर सभा कोल्हापूर शहरातील करवीर नगरीत पार पडली. या सभेला हजारो-लाखोंच्यावर जमसमुदाय जमलेला होता. कोल्हापूर शहरात युतीच्या पहिल्या सभेचे भाषण करताना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी कोल्हापूरच्या अंबाबाईचे दर्शन घेतले त्याच अंबाबाईचे विराट रूप म्हणून सभेला संभोदीत केले. पुन्हा शिवसेना भाजपा युती ही हिंदुत्वादाच्या मुद्दयावर झालेली युती आहे असे सुद्धा उद्धव ठाकरे यांनी बोलून दाखविले होते. आज कोल्हापूरच्या दोन्ही उमेदवारांना निवडणूक आणण्यासाठी जनतेचा आशीर्वाद महत्वाचा आहे. आता राजकीय धुरवळ सुरु होईल अनेक प्रकारचे रंग उधळले जातील परंतु आपल्याला पवित्र असा भगवा रंग पुढे घेऊन जायचा आहे असे सुद्धा सभेत बोलून दाखविले होते.

आज ५६ लोकं एकत्र जमले आहे. आज हातात-हात घालून उंच करून एकत्र असले तरी ते एकमेकांच्या पायात तंगडी घालून पडण्याचा प्रयत्न महाआघाडीचे नेते करत आहे. अश्या प्रकारे काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या महाआघाडीवर सुद्धा हल्लाबोल केला आहे. आज आम्ही पळवापळवी करत नाही असे बोलून राष्ट्रवादीचे शरद पवार यांना चिमटा सुद्धा काढला. पवार बोलले होते आम्ही दुसऱ्यांच्या पोरांचा विचार करत नाही तर, आम्ही आमच्या पोरान बरोबर दुसऱ्यांच्या पोरांचा सुद्धा विचार करतो असे बोलून सुजय विखेंच्या भाजपा प्रवेशावर पुन्हा एकदा पवारांना टोमणा मारला आणि पुढे कोल्हापूरचे प्रा. संजय मंडलिक आणि ध्येयशील माने यांना भारी बहुमताने निवडणूक आणण्याचे सुद्धा कोल्हापूर शहरातील शिवसेना आणि भाजपा कार्यकर्त्यांना आव्हान केले.

Leave a comment

0.0/5