Skip to content Skip to footer

पाचच्या वर कधी खासदार निवडून येत नाही अंन म्हणे आजोबांना पंतप्रधान बनवायचे आहे

लाेकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार पार्थ अजित पवार यांनी आजाेबांचे पंतप्रधानपदाचे स्वप्न पूर्ण करण्याचा विडा उचलला आहे. पिंपरी-चिंचवड येथे पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत त्यांनी ‘आपल्याला शरद पवार यांना पंतप्रधान करायचे आहे, कामाला लागा असे आवाहन आपल्या कार्यकर्त्यांना केले आहे. तसेच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एकेरी उल्लेख केला. ‘तो’ एक मोदी गुजरात भारतभर मांडू शकतो, तर पिंपरी-चिंचवड महाराष्ट्रभर का नाही मांडू शकत, असा तर्कही त्यांनी लावला आहे.

परंतु २०१४ च्या निवडणुकीला राष्ट्रवादी पक्षाने काँग्रेस या केंद्रीय पक्षा बरोबर युती करून फक्त राष्ट्र्वादीने महाराष्ट्रात मोजून पाच खासदार निवडून आणले होते. आपल्या पक्षाचा उमेदवार पंतप्रधान बनवण्यासाठी खासदारकीचा एक मॅजिक आकडा गाठावा लागतो आणि तो आकडा साहजिकच ३ आकडी असतो. परंतु राष्ट्रवादीने खासदारकीला कधीही दहाच्या वर खासदार निवडणून आणलेले नाही आहे. ते कसे काय पंतप्रधानांच्या शर्यतीत आपले नाव चालवू शकतात तसेच राष्ट्रवादी हा प्रादेशिक पक्ष आहे. त्यामुळे राष्ट्रवादीला संपूर्ण देशात लोकसभा निवडणूक लढून जास्तीत जास्त खासदार निवडून आणावे लागतील परंतु राष्ट्रवादी पक्षाला महाराष्ट्राच्या बाहेर कोणीही ओळखत नाहीत.

आज खासदारकीच्या शर्यतीत काँग्रेस पक्षाने पंतप्रधान पदाचा उमेदवार जाहीर केला आहे. त्यात महाआघाडीच्या अनेक नेत्यांनी स्वतःला पंतप्रधान पदाचा उमेदवार लोकसभा निवडणुकीच्या आधी जाहीर केला आहे. त्यात शरद पवार यांच्या पेक्षा जास्त खासदार निवडणून आणणाऱ्या पक्षांचा सुद्धा समावेश आहे. त्यामुळे आज पार्थ यांनी वर्तवलेली भविष्यवाणी खरी होईल का? यावरच प्रश्न चिन्ह निर्माण झालेले आहे.आज पार्थ पवार ज्या मावळ मतदार संघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहे. तेथील खासदार श्रीरंग बारणे यांनी आपल्या विरोधकाला ३,१५,७९६ इतक्या मोठ्या फरकाने पराभव केलेआहे. त्यामुळेच पार्थ ही निवडणूक जिंकतील का हाच प्रश्न सध्या जनतेला पडलेला आहे.

Leave a comment

0.0/5