आगामी लोकसभा निवडणुकीच्या रिंगणातून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने माघार घेतलेली आहे असे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जाहीर केलेलं आहे. परंतु मनसे लोकसभा निवडणुकीला उतरणार नसली तरी येणाऱ्या निवडणुकीला भाजपा पक्षातील उमेदवार जिथे-जिथे उभे आहे त्यांना पाडा असे आव्हानच राज ठाकरे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना केलेले आहे. आता त्यातच राष्ट्रवादीचे माजी मंत्री छगन भुजबळ यांनी येणाऱ्या लोकसभेला मनसेमुळे राष्ट्रवादीला फायदा होणार आहे असे वक्तव्य केले आहे त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीला राज ठाकरे छुप्या मार्गाने राष्ट्रवादीला मदत करत आहे हे आता सिद्ध झालेले आहे.
देशात भाजपाविरोधी वातावरण आहे. त्यामुळे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जे त्यांच्या भाषणात मुद्दे मांडले आणि जी भूमिका जाहीर केली त्याचा फायदा राष्ट्रवादीला निश्चितपणे होईल. देशात भाजपाविरोधी वातावरण आहे. राज ठाकरे यांनी ते आता पुढचा प्रचार नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांना हटवण्यासाठी करणार आहेत असं जाहीर केलं आहे. याचा आम्हाला फायदा होईलच असे भुजबळ यांनी म्हणून दाखविले होते. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे वक्तव्य केले होते. काहीच दिवसापूर्वी राज ठाकरे यांनी शरद पवार यांची त्यांच्या बंगल्यावर भेट सुद्धा घेतलेली होती.
एक काळ असा होता की नाशिक महापालिकेत सत्ता येण्याआधी राज ठाकरेंनी जे भाषण केले होते त्यात छगन भुजबळ यांची नक्कल करत त्यांच्यावर चांगलीच टीका केली होती. आता मात्र राज ठाकरेंचा सूर बदलला आहे. त्यामुळेच त्यांनी घेतलेली भूमिका कशी योग्य आहे हे आता छगन भुजबळच प्रसारमाध्यमांना सांगत आहेत त्यामुळे येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीला राज ठाकरे यांचा पक्ष विधानसभेची तयारी करताना दिसत आहे. परंतु राज ठाकरे यांच्या भाजपा विरोधी निर्णयाला महाराष्ट्रातील जनता कौल देते का? हे येणाऱ्या लोकसभानिवडणुकीला दिसून येईल.