Skip to content Skip to footer

खासदार अरविंद सावंत पुन्हा दक्षिण मुंबईत भगवा फडकवणारच

येणाऱ्या आगामी लोकसभा निवडणुकीत दक्षिण मुंबईत पुन्हा खासदार अरविंद सावंत मोठ्या मताने निवडून येऊन भगवाच फडकवणार असा विश्वास शिवसैनिकांनी आणि भागातील नागरिकांनी व्यक्त केला आहे. येणाऱ्या निवडणुकीला दक्षिण मुंबईतून मिलिंद देवरा यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे. तसेच दोन दिवसापूर्वी देवरा यांना मुंबई अध्यक्ष पदाची धुरा त्यांच्या खांद्यावर देऊन मुंबईतील सर्व खासदार निवडून आणायची जबाबदारी देण्यात आलेली आहे. त्यामुळे येणाऱ्या लोकसभेला ते आपल्या भागात आपला प्रचार करणार की, मुंबईतील इतर उमेदवार यांचा प्रचार करणार ही पंचायत सध्या देवरा यांची झालेली आहे.

खासदार अरविंद सावंत यांनी मतदारसंघातील विविध प्रश्न लोकसभेत प्रभावीपणे मांडून ते सोडवण्यात यश मिळवले आहे. नोकरी आणि व्यवसायानिमित्त रोज दक्षिण मुंबईत प्रवास करणाऱया लाखो लोकल प्रवाशांच्या समस्या सोडवून त्यांना दिलासा दिला. लोकसभेत लोकांचे सर्वाधिक प्रश्न मांडणारे खासदार म्हणूनही त्यांना गौरवण्यात आले. शिवसेनेच्या त्या कार्यापुढे काँग्रेसची कामे नगण्य ठरली आहेत किंबहुना मिलिंद देवरा हे मुरली देवरांसारखे काम करण्यात तोकडे पडले आहेत. तसेच आज तेथील अंतर्गत वादाचा सुद्धा मिलिंद देवरा यांना फटका बसू शकतो.

दक्षिण मुंबईतील उमेदवार निवडून येण्यासाठी तेथील बहुतेक मुस्लिम मते ही निर्णयात्मक ठरतात. परंतु आगामी लोकसभा निवडणुकीला भारिप बहुजन महासंघ आणि एमआयएम यांच्या संयुक्त वंचित बहुजन आघाडी यांच्या वाटेला तेथील बहुतेक काँग्रेस पक्षाची मुस्लिम मते वंचित आघाडीच्या उमेदवाराला पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे साहजिकच येणाऱ्या लोकसभेला देवरा यांच्या पारड्यात पडणारी मते ही वंचितच्या वाटेला जाणार ही शक्यता नाकारता येणार नाही त्यामुळे दलित मतांबरोबर मुस्लिमांचीही मते ही वंचित बहुजन आघाडीला मिळतील आणि याचा सर्वाधीक जास्त फटका काँग्रेसला म्हणजेच देवरा यांना सर्वाधिक बसेल असेच बोलले जात आहे.

Leave a comment

0.0/5