आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपा अध्यक्ष अमित शहा हे गांधी नगर मतदार संघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे. त्यांचा निवडणुकीचा अर्ज भरण्यासाठी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सुद्धा शहा यांच्या निमंत्रणा वरून आज गुजरात गांधी नगर येथे हजेरी लावलेली होती. त्यामुळे अनेकांच्या भुवळ्या उंचावलेल्या होत्या. भाजपा अध्यक्ष अमित शहा यांचा निवडणुकीचा अर्ज भरण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी गांधी नगर मध्ये हजेरी लावलेली असताना मी अमित शहा यांना सुभेच्छा देण्यासाठी आलेलो आहे असे मत उद्धव ठाकरे यांनी बोलून दाखविले होते.
आज आपण येथे आल्याने अनेकांच्या पोटात दुखत असणारच पण या पोटदुखीचा आमच्याकडे इलाज आहे असे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी बोलून विरोधकांना सुद्धा चिमटा काढलेला आहे. आज अमित शहा आपल्याला भेटायला आले. आमच्यात चर्चा झाली आणि दोन्ही पक्षातील मतभेत आता संपलेले आहे असे मत सुद्धा मांडले. आज शिवसेना आणि भाजपची विचारधारा एका आहे. आता आमचे विचार आणि हृद्य जुळलेले आहे. आज विरोधी पक्षाचे विचार जुळलेले नाही तरी ते एकत्र आलेले आहेत आणि या दोन्ही पक्षाची हिंदुत्त्वाची एकच भूमिका असून आता आम्ही एकत्र आलो आहोत असे मत सुद्धा पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मांडलेले होते.