Skip to content Skip to footer

“डल्लामार” कसा ओळखावा भाजपाची पोस्ट वायरल…

आगामी लोकसभा निवडणूकीच्या तोंडावर प्रचारा बरोबर सोशल मीडियाचा वापर सध्या सर्वच राजकीय पक्ष करताना दिसत आहे. म्हणूनच आजचे युग हे डिजिटल युग म्हणून बोलले जात आहे. मग या डिजिटल युगात राजकारणी तरी कसे मागे राहतील. आज सोशल मीडियाच्या माध्यमातून सुद्धा एकमेकांवर टीका केली जात आहे. राष्ट्रवादीच्या अधिकृत पेजवर मोदी फक्त कसा ओळखावा म्हणून पोस्ट वायरल केली जात आहे. यात मोदी भक्त कसा ओळखावा म्हणून पाच मुद्धे मांडलेले आहे. अपमानकारक भाषा, कोणत्याही मुद्द्यावर अभ्यास नाही, सोशल मीडियावर फेक फॉरवर्ड असे मुद्धे मांडण्यात आलेले आहेत.

या उत्तराला शांत बसेल ती भाजप काय, भाजपाच्या सोशल मीडियाने सुद्धा “डल्लामार कसा ओळखावा म्हणून राष्ट्रवादीच्या पवारांवर टीका केलेली आहे. त्याची काही उदाहरणे सुद्धा दिलेली आहे. नेहमी लोकांच्या पैशावर डोळा, गरीब शेतकऱ्यांच्या जमिनी हडपण्याच्या सवयी, कोट्यावधि संपत्ती आणि श्रीमंत नातेवाईक, मिळेल त्या खात्यात घोटाळा करण्यासाठी टपलेली मंडळी, ही प्रजाती जास्त ” राष्ट्रवादी काँग्रेस” नामक पक्षात सापडते. अशा प्रकारच्या पोस्ट सध्या वायरल होत आहे.

लोकसभा निवडणुकांच्या रणधुमाळीत राष्ट्रवादी काँग्रेसने सोशल मीडियाचा पुरेपूर उपयोग केल्याचे दिसून येते आहे. याआधीही त्यांनी काही व्यंगचित्रं पोस्ट करून भाजपावर निशाणा साधला होता. आता पुन्हा एकदा मोदी भक्तांवरून त्यांनी व्यंगचित्र ट्विट करत भाजपावर आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली होती. परंतु या टीकेला भाजपा मीडिया सेलने सुद्धा सडेतोड उत्तर दिलेले आहे. आज सर्वच राजकीय पक्षात सोशल मीडियाचा पुरेपूर वापर करून घेण्यात भाजपा पक्ष अग्रेसर असताना दिसत आहे.

Leave a comment

0.0/5