शिवसेना खासदारांच्या कामगिरीची परिवर्तन संस्थेने घेतली दाखल…

‘परिवर्तन’ या स्वयंसेवी संस्थेने देशातील खासदारांचे रिपोर्ट कार्ड तयार केले I आहे. त्यामध्ये सार्वधिक खासदाराने मध्ये उपस्थित असलेल्या महाराष्ट्रातील मुंबई दक्षिणचे खासदार अरविंद सावंत (९७.३ टक्के) यांचा पहिला क्रमांक आला आहे. मुंबई उत्तरचे खासदार गोपाळ शेट्टी (९७.३ टक्के) द्वितीय तर लातूरचे खासदार डॉ. सुनील गायकवाड यांचा (९६.१ टक्के) तृतीय क्रमांक आहे. बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे आणि मुंबई दक्षिण मध्यचे खासदार राहुल शेवाळे या दोघांचा (९५.८ टक्के) पहिल्या पाचात समावेश आहे. ‘परिवर्तन’ या स्वयंसेवी संस्थेने तयार केलेले खासदारांचे ‘रिपोर्ट कार्ड’ सोमवारी प्रसिद्ध करण्यात आले. प्रकल्प प्रमुख अंकिता अभ्यंकर आणि परिवर्तन संस्थेचे कार्यकर्ते सायली दोडके, दीपक बाबर यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. त्यामुळे शिवसेना खासदारांच्या कामाची परिवर्तन या स्वयंसेवी संस्थेने दाखल घेतलेली दिसून येत आहे. लोकसभेत सर्वाधिक चर्चामध्ये सहभाग घेणाऱ्या महाराष्ट्रातील खासदारांमध्ये मावळचे खासदार श्रीरंग बारणे (२९७ चर्चात सहभाग) यांचा प्रथम क्रमांक लागतो. मुंबई दक्षिणचे अरविंद सावंत (२७१ चर्चा) द्वितीय तर हिंगोलीचे राजीव सातव (२३३ चर्चा) तृतीय क्रमांकावर आहेत. मुंबई दक्षिण मध्यचे खासदार राहुल शेवाळे (२०३ चर्चा) चौथ्या क्रमांकावर आहेत. स्वतंत्रपणे सर्वाधिक विधेयके मांडणाऱ्या महाराष्ट्रातील खासदारांमध्ये शिरूरचे शिवाजीराव आढळराव पाटील आणि मावळचे श्रीरंग बारणे (२० विधेयके) यांचा प्रथम क्रमांक आहे. जळगावचे ए. टी. नाना पाटील (१७ विधेयके) औरंगाबादचे चंद्रकांत खैरे (१६ विधेयके) आणि मुंबई उत्तर मध्यच्या पूनम महाजन (९ विधेयके) यांचा पहिल्या पाच खासदारांमध्ये समावेश आहे H.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here