Skip to content Skip to footer

आनंद परांजपे हा बळीचा बकरा,कासव आणि आमदार, गणेश नाईकांचे वक्तव्य

ठाणे लोकसभा मतदार संघातून राष्ट्रवादी पक्षाने आनंद परांजपे यांना उमेदवारी दिलेली आहे. त्यांच्या विरोधात शिवसेना पक्षाचे उमेदवार खासदार राजन विचारे यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे. परांजपे हे २००४ च्या निवडणुकीला कल्याण मतदार संघातून डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या विरोधात उतरले होते परंतु शिंदे यांनी भारी बहुमताने परांजपे यांचा पराभव केला होता. आता पुन्हा राष्ट्र्वादीने ठाणे मतदार संघातून परांजपे यांना उमेदवारी देऊन त्यांना बळीचा बकरा बनवला असल्याचे बोलले जात आहे. परांजपे हे नेमके कोण असाच प्रश्न सध्या मतदारांना पडला आहे. परांजपे यांच्या प्रचाराची धुरा ज्यांच्यावर सोपवण्यात आली आहे ते म्हणजे माजी मंत्री गणेश नाईक यांनी परांजपे हे बळीचा बकरा, खासदार नाही तर आमदार आहे असे बोलून परांजपे हे आपल्या सभेतच हास्याचा विषय बनत चालले आहे.

लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीचे उमेदवार आनंद परांजपे यांचा प्रचाराची जबाबदारी राष्ट्रवादीचे माजी मंत्री गणेश नाईक यांच्यावर सोपवण्यात आलेली आहे. परंतु नाईक हे परांजपे यांचा प्रचार करत आहे की अपप्रचार ह्यची चर्चा सध्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांन मध्ये चालू झाली आहे. नवी मुंबईतील एका जाहीर सभेत गणेश नाईक यांनी राष्ट्रवादीला उमेदवार सापडत नाही म्हणून आनंद परांजपे यांना फक्त बळीचा बकरा बनविण्यासाठी उभे केले की काय असा सवाल केला. पुढच्या क्षणी त्यांना आपली चूक समजली आणि त्यांनी नाही ते बळीचा बकरा नाहीत अशी सारवासारव केली दुसऱया एका सभेत त्यांनी परांजपेंना थेट कासवाची उपमा दिली. नाईक म्हणाले, आघाडीचे उमेदवार हे कासवाच्या भूमिकेत आहेत.

नवी मुंबईतील एका सभेला आनंद परांजपे हे लोकसभेला उभे आहेत की विधानसभेला हेच ते विसरले आणि ठाण्याचे नवीन आमदार परांजपे असतील असा उल्लेख त्यांनी सभेला केला होता. ठाण्याचे आमदार आनंद परांजपेच असतील असे नाईक यांनी छातीठोकपणे जाहीर केले तेव्हा व्यासपीठावर बसलेले परांजपे मात्र चांगलेच कानकोंडे झाले. त्यामुळे प्रचारसभा नको पण नाईकांना आवरा अशीच अवस्था परांजपें यांची झाल्याची चर्चा कार्यकर्त्यांमध्ये आहे. यातूनच गणेश नाईक राष्ट्रवादीचे उमेदवार आनंद परांजपे यांना निवडणूक आणण्यासाठी किती मेहनत घेत आहे हेच दिसून येते.

Leave a comment

0.0/5