लोकसभा निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी आघाडीला अनुकूल चित्र दिसत आहे. आपण अनेक निवडणुका पाहिल्या, यापुर्वी देशाचा पंतप्रधान महाराष्ट्रात एक-दोन वेळा प्रचारासाठी येत होते. आता नरेंद्र मोदी यांना दर दोन-तीन दिवसांनी महाराष्ट्रात यावे लागते, यावरून येथील राजकीय हवा बदलत असल्याचे सूचक विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी कोल्हापूरात आयोजित पत्रकार परिषदेत वक्तव्य केले होते. कोल्हापुरात ते राष्ट्रवादीचे उमेदवार धनंजय महाडिक यांच्या प्रचारासाठी आले होते.
या चर्चा दरम्यान काही महिन्यावर येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीला महाराष्ट्र नवनिर्माण सेना राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षच्या महाआघाडीत सामील होऊ शकते असे सूचक विधान पवारांनी केले आहे. त्यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीला मनसे सुद्धा महाआघाडीचा एक भाग असेल असेच चित्र दिसून येणार आहे. नांदेड येथे झालेल्या सभेला राज ठाकरे यांनी नरेंद्र मोदी आणि भाजपा पक्षावर जोरदार हल्ला चढवला होता त्यामुळे नांदेड येथे झालेल्या सभेचा फायदा काँग्रेस उमेदवार अशोक चव्हाण यांना होणार हे नाकारता येणार नाही.
राज ठाकरे यांच्या कडून अद्याप अधिकृतपणे काँग्रेस राष्ट्रवादी बरोबर जाण्याच्या भूमिके बद्दल काहीही स्पष्ठीकरण आले नसले तरी भाजपा विरोधात भूमिका मांडून ते महाआघाडीच्या उमेदवारांचा फायदा करताना दिसणार आहे. तसेच भाजपा उमेदवारांना मतदान न करता इतर उमेदवारांना मतदान करण्याचे आव्हान कार्यकर्त्यांना केले आहे. आज राज ठाकरे आणि शरद पवार यांच्यातील जवळीक महाराष्ट्रातील राजकारणा बद्दल भरपूर काही सांगून जात आहे. त्यामुळे शरद पवारांच्या भाकीत प्रमाणे राज ठाकरे आणि संजय निरुपम एकाच व्यासपीठावर जवळ – जवळ बसलेले आढळले तर आश्चर्य वाटायला नको.