Skip to content Skip to footer

रायगड मध्ये मुस्लिम तरुण मोठ्या संख्येने शिवसेनेत

हिंदुत्व या राष्ट्रीय मुद्द्यावर शिवसेना आणि भाजपा राज्यात पुन्हा एकत्र आले आहेत. हिंद्त्ववादी सत्ता आणण्याच्या मुद्द्यावर शिवसेना मतदारांना साथ देत आहे. दुसरीकडे मुस्लिम मतदारांना एकत्र घेऊन जाण्याकडे शिवसेना यशस्वी होताना दिसत आहे. माजी मुख्यमंत्री बॅरिस्टर ए. आर. अंतुले यांचे चिरंजीव नवीद अंतुले यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर शिवसेनेने रायगड जिल्हयात सोशल इंजिनीअरिंग सुरू केले आहे. आणि ते यशस्वी होताना दिसत आहे. रायगडमधील शिवसेनेचे उमेदवार अनंत गीते यांच्या ठिकठिकाणी होणाऱ्या प्रचार सभांमध्ये मुस्लिम तरूण मोठया संख्येने शिवसेनेत प्रवेश करू लागले आहेत. यामुळे राष्ट्रवादीचे उमेदवार सुनील तटकरे यांची डोकेदुखी वाढली आहे.

रायगड मतदार संघात शिवसेना पक्षाकडून खासदार आनंद गीते यांना उमेदवारी देण्यात आली आहे तर महाआघाडी कडून राष्ट्रवादीचे सुनील तटकरे यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे. परंतु राष्ट्रवादी आणि काँग्रेस सरकारच्या काळात तटकरे यांचे नाव सिंचन घोटाळ्यात आल्यामुळे रायगड मध्ये तटकरे घोटाळेबाज म्हणून प्रसिद्ध झालेले आहे. त्यातच मंत्री अंतुले यांचे चिरंजीव नवीद अंतुले यांच्या शिवसेना पक्षाच्या प्रवेशामुळे रायगड मतदार संघात शिवसेना पक्षला अधिकच बळ मिळालेले दिसून येत आहे. त्यामुळे आज मोठ्या प्रमाणात मुस्लिम तरुण शिवसेना पक्षात प्रवेश करताना दिसत आहे.

आंबेत या बॅरिस्टर अंतुले यांच्या जन्मगावी झालेल्या शिवसेनेच्या मुस्लिम समाज मेळाव्याला जवळपास २ हजार मुस्लिमांनी हजेरी लावली. विशेष म्हणजे मुस्लिम समाजातील महिलाही मोठया संख्येने उपस्थित होत्या. मुस्लिम समाजाकडे व्होट बँक म्हणून काही लोक पहात होते. परंतु त्यांची जहागिरी संपली असल्याचा टोला अनंत गीते यांनी सुनील तटकरे यांना यावेळी लगावला. आज पर्यंत शिवसेना पक्षाची भीती दाखवून राष्ट्र्वादीने मुख्य प्रवाहा पासून मुस्लीम तरुणांना दूर ठेवले होते परंतु आता मुस्लिम तरुणांनी विकासाच्या प्रवाहात सामील व्हावे असे नवीद अंतुले यांनी बोलून दाखविले होईल.

Leave a comment

0.0/5