Skip to content Skip to footer

खासदार कीर्तिकर कर्मयोगी तर आदित्य ठाकरे युथ आयकॉन – इंडिया टुडे

राजकीय, सामाजिक, क्रीडा आणि शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे ज्येष्ठ शिवसेना नेते-खासदार गजानन कीर्तिकर हे ‘कर्मयोगी’ तर शिवसेना नेते-युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे ‘युथ आयकॉन’ आहेत असा गौरवास्पद उल्लेख आघाडीच्या इंग्रजी वृत्त पाक्षिकाने आपल्या ताज्या अंकातील लेखात केला आहे. त्यामुळे शिवसेना पक्षाच्या कामगिरीची दखल देशातील एका प्रसिद्ध वृत्तपत्राने घेतलेली दिसून येत आहे. मुंबईसह महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी तळमळीने कार्य करणारे आणि राज्यभरातील युवकांना आपल्या तडफदार व सेवाभावी वृत्तीने प्रेरणा देणारे शिवसेना नेते-युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे खऱया अर्थाने ‘युथ आयकॉन’ आहेत.

यंदाच्या सतराव्या लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने ‘इंडिया टुडे’ने शिवसेना खासदार गजानन कीर्तिकर यांच्या ५० वर्षांच्या सामाजिक, राजकीय प्रवासातील कार्याचा लेखाजोगा मांडणारा लेख प्रसिद्ध केला आहे. त्यात कबड्डी, खोखो आणि शरीरसौष्ठव या मराठमोळ्या खेळांना लोकाश्रय व राजाश्रय मिळवून देण्यासाठी कीर्तिकर यांनी दिलेल्या बहुमूल्य योगदानाचा उल्लेख आहे. २०१० ची राज्य अजिंक्यपद कबड्डी स्पर्धा, २०१८ ची राष्ट्रीय कबड्डी स्पर्धा आणि २०१४ च्या वर्ल्ड बॉडीबिल्डिंग स्पर्धेचे यशस्वी आयोजन करण्यात खासदार कीर्तिकर यांचे मोठे योगदान होते. जागतिक बॉडीबिल्डिंग संघटनेने कीर्तिकर यांना ‘चीफ पेट्रोन’ म्हणून गौरवल्याचा उल्लेखही या लेखात आहे.

गजानन कीर्तिकर हे मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदार संघातून शिवसेना पक्षाचे खासदार आहेत. खासदार कीर्तिकर यांनी मुंबई उत्तर-पश्चिम मतदारसंघात रेल्वे प्रवाशांसाठी सरकते जिने, बेंचेस, लिफ्ट, प्रतीक्षालय तर ओशिवरा रेल्वे स्थानकाला ‘राममंदिर’ नाव देण्यासाठी पाठपुरावा केला. शिवाय गोरेगाव आणि अंधेरी लोकल स्थानकांचा समावेश मॉडेल स्थानकांत करून घेतला. वांद्रे ते बोरिवली स्थानकांदरम्यान सहावा रेल्वे ट्रक, मुंबईतील रेल्वे फलाटांची उंची वाढवून घेण्याची कामेही आपल्या खासदारकीच्या कारकीर्दीत मार्गी लावली.

Leave a comment

0.0/5