काँग्रेस दक्षिणचे उमेदवार मिलिंद देवरा यांच्या प्रचारार्थ मुंबईतील श्रीमंत व्यक्तींची फौज सध्या सोशल मीडियावर प्रचार करताना दिसत आहे. काँग्रेस पक्ष आणि मिलिंद देवरा यांच्या फेसबुक पेजवर खुद्ध रीयलान्स उद्योग समूहाचे अध्यक्ष अनिल अंबानी हे खासदार म्हणून मिलिंद देवरा पाहिजेत असे मत त्यांनी मांडले आहे तसेच अनेक उद्योग समूहांच्या अध्यक्षांनी देवरा यांना आपला पाठिंबा दर्शवला आहे. मिलिंद देवरा यांच्या विरोधात शिवसेना खासदार अरविंद सावंत हे निवडणुकीच्या रिंगणात त्यांना टक्कर देणार आहे. या पाठिंब्यामुळे देवरा यांना विजय करण्यासाठी एक भलीमोठी व्यापारी वर्गाची ताकद देवरा यांच्या मागे उभी राहिलेली दिसून येत आहे. आज उद्योगपती मुकेश अंबानी हे मिलिंद देवरा यांचे तोंडभरून कौतुक करताना दिसत आहेत.
यावर प्रतिक्रिया देताना आशिष शेलार यांनी काँग्रेसला टोला लगावला आहे. आशिष शेलार यांनी म्हटलं की, ‘कोणी कोणाचा प्रचार करावा हा ज्याचा त्याचा विषय आहे. आमच्याकडे फडणवीसांचं समर्थ नेतृत्व आहे. भाजपाला कोणत्याही उद्योगपतीची गरज भासली नाही. पण आम्हाला अंबानीचे सरकार म्हणणाऱ्यांनाच अंबानी हवे असल्याचे आज लोकांना कळले आहे. असा टोला भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी लगावला आहे. काँग्रेसचे दक्षिण मुंबईतले उमेदवार मिलिंद देवरा यांना एका व्हिडिओतून मुकेश अंबानी यांनी पाठिंबा दर्शवला आहे. त्यावरुन आशिष शेलारांनी काँग्रेसला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला.