राज ठाकरे तुम्ही चुकलात…..

राज ठाकरे | Raj-Thackeray-you-wrongly

राज ठाकरे महाराष्ट्रातील वादळी नाव, शिवसेना पक्षातून विभक्त होऊन आपण ९ मार्च २००६ रोजी महाराष्ट्रातला नवी दिशा देण्यासाठी “महाराष्ट्र नवनिर्माण सेना” या पक्षाची स्थापना केली. मा. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या कडून आपण राजकारणाचे धडे शिकलात. आज तुमच्या बोलण्यात वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांची झलक महाराष्ट्राला दिसून येते. या महाराष्ट्रातील युवा पिढी आपल्याला आयकॉन मानू लागली आहे. आज आपला नवीन पक्ष असून सुद्धा महाराष्ट्रात १० च्यावर आमदार निवडून आणून आपण आपल्या पक्षाची ताकत अख्या महराष्ट्राला नाही तर देशाला दाखवून दिली होती आणि इतके प्रेम सुद्धा मराठी माणसाने आपल्यावर केले.

सोलापुरात राज ठाकरे यांची जाहीर सभा

मराठी माणसाच्या हक्कसाठी लढणारा पक्ष म्हणून आपला पक्ष महाराष्ट्रात ओळखला जाऊ लागला. मराठी माणसाच्या प्रश्नांवर भांडणारा, त्यांच्या हक्कासाठी लढणारा गरज पडल्यास रस्त्यावर उतरणारा पक्ष म्हणून आपला पक्ष नावा-रुपाला आला. आज मराठी तरुणांच्या नोकरीचा प्रश्न, रेल्वे भरती मध्ये मराठी तरुणांनसाठी लढ़लेली लढाई आजही मराठी माणसाच्या लक्षात आहे. आपल्या सभेला जमणारी लाखोंची गर्दी ही फक्त आपल्या प्रेमापोटी जमणारी गर्दी आहे. पण राजसाहेब ठाकरे आपण चुकला असेच आज बोलावेसे वाटते.

२०१९ च्या निवडणुकीला आपण भाजपा आणि त्यांच्या मित्र पक्षाच्या विरोधात भूमिका मांडत आहात. पण कुठेतरी राष्ट्रवादी-काँग्रेस पक्षाच्या बाजूने आपण बोलत आहात असेच आज महाराष्ट्रातील जनतेला जाणवते. आज इतकी वर्ष राज्य करणाऱ्या या काँग्रेस पक्षाने फक्त मराठी मतांचा फायदा घेऊन केंद्रात फक्त तिजोरी भरायचे काम केले. म्हणूनच आपण काँग्रेस पक्षावर अनेक वेळा टीका केली आणि आज त्याच पक्षाला जिंकवण्यासाठी आपण आपल्या विचारात बदल केला म्हणून आपण आज चुकलात असेच महाराष्ट्रातील मराठी माणसाला वाटत आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here