लोकसभा निवडणुकीला एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप चालूच असतात त्यातच राष्ट्रवादीचे उमेदवार धनंजय महाडिक यांनी शिवसेना उमेदवार प्रा. संजय मंडलीक यांच्यावर आणि कोल्हापूरचे भाग्यविधाते माजी खासदार सदाशिव मंडलिक यांच्यावर आरोप केले आहे. या आरोपाचा वैशाली मंडलिक यांनी समाचार घेतलेला आहे. यांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत म्हणाल्या की, मांडलिकांनी या जिल्ह्यासाठी काहीच केले नाही असा प्रचार सध्या चालू आहे. जर मांडलिकांनी काहीच केले नाही तर या जिल्यातील जनता तनाने, मनाने आणि धनाने मांडलिकांच्या मागे उभी राहिली असती का? असा थेट प्रश्न धनंजय महाडिकांना विचारला आहे.
पुढे त्यांनी २००४ च्या निवडणुकीला खा. सदाशिव मांडलिकांचा मोठेपणा समोर आणला. त्या म्हणाल्या की, मोठ्या साहेबानं कडून धनंजय महाडिक यांचा पराभव झाला होता. त्यानंतर धनंजय महाडिक हे साहेबांचे अभिनंदन करण्यासाठी हार घेऊन आले. तेव्हा साहेब म्हणाले की, तू व्यवसायिक आहे. तुझी स्वतःची राजकारणात ताकद तयार कर, त्यासाठी युवाशक्ती तयार कर, पुढे ते म्हणाले की, खानविलकर वैहीनींनी बचत गट तयार केले आहे तसे बचत गट तयार कर त्यांच्याकडे जाऊन ये असे सल्ले देऊन तुमच्या आयुष्याला सदाशिव मंडलिक साहेबांनी दिशा दिली असे बोलून जुन्या आठवणींना उजाळा दिला.
मंडलिक साहेबांनी इतकी वर्ष राजकारण केले पण त्यांनी तत्त्व बाळगून राजकारण केले आहे. आज ते हयात नसताना त्यांच्यावर आरोप करणे हे एका खासदाराला न शोभणारे आहे. खासदाराचा मुलगा म्हणून मला आयते पद द्या अशी मागणी संजय यांनी कधीच केली नाही. मोठ्या साहेबांनी तू तुझा पायावर उभे राहा अशीच शिकवण दिली. तसेच महाडिकांवर टीका करताना त्या म्हणाल्या की, महाडिक ८ हजार कोटींच्या विकासकांमे केल्याचे सांगत आहे. परंतु विकास कामे करण्यासाठी कुठला सत्ताधारी पक्ष आपल्या विरोधकाला निधी देईल असे सुद्धा बोलून दाखविले.