पवार साहेब जेव्हा चड्ड्या घातल्या जात होत्या, तेव्हा तुम्ही ह्याच चड्डीवाल्यांचा पाठिबा घेऊन मुख्यमंत्री झाला होता. तेव्हा चड्ड्या चांगल्या वाटल्या. आता तुमच्या कडून गेल्या नंतर चड्ड्या आठवायला लागल्या आहेत. २३ तारखेलाच कळेल कोणाची चड्डी उतरते असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांनी शरद पवारांना लगावला आहे. ते रेल्वे मैदानात महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी फडणवीस बोलत होते. शरद पवारांचा तोल सुटला आहे. ते म्हणाले होते की, भाजपा मध्ये गेला तर हात चड्डी घालून मांड्या दाखवू नका. परंतु पवार साहेब आता हापचड्या नाहीत तर संघात फुलपॅन्ट घातली जात आहे असा टोला सुद्धा मुख्यमंत्र्यांनी पवारांना मारला होता.
गरिबी हटवू, गरिबी हटवू असे म्हणत ५५ वर्ष सत्तेत असलेल्या काँग्रेसने गरिबी काही हटवली नाही. परंतु त्यांच्या चेल्यांची आणि नेत्यांची गरिबी मात्र हटलेली आहे असा टोला सुद्धा राष्ट्रवादी आणि काँग्रेस नेत्यांना लगावला होता. पुढे ते म्हणाले की, काँग्रेसने पुन्हा पूर्ण न केलेली आश्वासनेच देशाला दिलेली आहे. परंतु गेल्या पाच वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माणसाच्या जीवनात अनेक परिवर्तन करणाऱ्या उपयोगी योजना आणल्या आहेत. लातूर मध्ये आमच्या सरकारने ६० दिवसात रेल्वेचे कोच बसवणाऱ्या कारखान्याला परवानगी देऊन भूमिपूजन सुद्धा केले आहे. या लोकसभा निवडणुकी नंतर रेल्वे मंत्री प्रत्यक्ष येऊन येथील कारखाण्याचा प्रश्न सोडवतील असे आश्वासन सुद्धा मुख्यमंत्र्यांनी दिले आहे.