Skip to content Skip to footer

मावळचा मतदारसंघ नातवाला चॉकलेट म्हणून दिला – प्रकाश आंबडेकर

वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी पुणे येथे पार पडलेल्या वंचित आघाडीच्या सभेला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि मावळचे उमेदवार पार्थ अजित पवार यांच्यावर जोरदार टीका केली. लोकसभा निवडणूक म्हणजे नातवाचे लाड पुरवणारी निवडणूक नाही. तसेच मावळ मतदार संघ हा नातवाला चॉकलेट म्हणून दिलेला मतदार संघ नाही असा टोला सुद्धा आंबेडकरांनी पवारांना लगावला होता. पुण्यात भाजप-शिवसेना युतीकडून गिरीश बापट, काँग्रेस-राष्ट्रवादीकडून मोहन जोशी, तर वंचित बहुजन आघाडीकडून अनिल जाधव निवडणूक मैदानात आहेत. अनिल जाधव यांच्या प्रचारासाठी पुणे येथे आंबेडकरांच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते

सध्याचे राजकारण थट्टा मस्करीचे झाल्याचे मत व्यक्त करत आंबेडकरांनी पार्थ पवार यांनाही लक्ष्य केले. ते म्हणाले वंचितांना आव्हान देत मावळचा मतदारसंघ चॉकलेट म्हणून वापरण्यात येत आहे. तो आता नातवाला थेट चॉकलेट म्हणून दिला आहे.प्रकाश आंबेडकरांनी अजित पवार आणि पार्थ पवार यांच्यावरही टीकास्त्र सोडले. मावळ मतदारसंघ कुणाची जहागिरी नसल्याचे म्हणत त्यांनी थेट अजित पवार यांना आव्हान दिले. तसेच पार्थ पवार यांना लक्ष्य करत “उद्याची सत्ता रेव्ह पार्टी करणाऱ्यांच्या हातात देणार का?” असा जहरी प्रश्न आंबेडकरांनी उपस्थित केला. पुण्यात लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात २३ एप्रिलला मतदान होत आहे. या दिवशी पुण्यासह महाराष्ट्रात १४ जागांसाठी मतदान होईल.

Leave a comment

0.0/5