Skip to content Skip to footer

एकनाथ गायकवाड यांच्या प्रचाराला नेत्यांनी आणि जनतेने फिरवली पाठ…

लोकसभा निवडणुकीला दक्षिण मध्य मुंबई मतदार संघात दुहेरी लढत बघयला मिळणार आहे. या मतदार संघात शिवसेना पक्षाचे खासदार राहुल शेवाळे तर दुसरीकडे काँग्रेस पक्षा कडून माजी खासदार एकनाथरावजी गायकवाड यांना पक्षा कडून तिकीट मिळालेली आहे. परंतु आज एकनाथ गायकवाड यांच्या सभेला जनतेचा मिळत असलेला तुल्य प्रतिसाद पाहून येणाऱ्या निवडणुकीला पुन्हा राहुल शेवाळे यांचा विजय निश्चित होणार असेच मानले जात आहे. या पराभवाला तशी अनेक कारणे सुद्धा आहे. या मतदार संघात महायुतीच्या आमदारांची आणि नगरसेवकांची संख्या जास्त प्रमाणात आहे. तसेच गायकवाड यांच्या प्रचाराला काँग्रेसच्या बड्या नेत्यांनी सुद्धा पाठ फिरवलेली आहे.

आज राहुल शेवाळे यांना असलेला बृहमुंबई महानगर पालिकेत असलेल्या कामाच्या अनुभवातून तसेच ते स्वतः सिव्हिल इंजिनिअर असल्यामुळे धारावी आणि बीडीडी पुर्नविकाचा प्रश्न ते सहजच सोडवू शकतात असेच विभागातील मतदारांना वाटत आहे. आज आयएसओ प्रमाणपत्र मिळणारे खासदार शेवाळे यांचे देशातील प्रथम कार्यालय आहे आणि हा मान फक्त खा. शेवाळे यांच्यामुळे या मुंबईला मिळालेला आहे अशी सुद्धा जनतेची भावना आहे. तसेच काही दिवसापूर्वी खासदार शेवाळे यांना संसदरत्न या पुरस्कारने सुद्धा दिल्लीत गौरविण्यात आले होते. शेवाळे यांच्या कामाच्या पद्धतीमुळे विभागातील अनेक प्रश्न मार्गी लागलेले दिसून येत आहे.

आज शिवसेना आणि काँग्रेस कडून उभे असलेल्या दोन्ही उमेदवारांच्या वयाचा विचार केला असता गायकवाड यांचे वय हे ७९ वर्ष इतके आहे. त्यामुळे काँग्रेसने या मतदार संघात एकदा तरुण तडफदार उमेदवार द्यावा अशीच कार्यकर्त्यांची मागणी होती परंतु ही मागणी अशोक चव्हाण यांनी धुडकावून पुन्हा एकदा एकनाथ गायकवाड यांना संधी दिलेली आहे त्यामुळे काँग्रेस पक्षातच गटबाजी निर्माण झालेली दिसून येत आहे आणि या गटबाजीचा गायकवाड यांना फटका बसून राहुल शेवाळे पुन्हा एकदा भारी बहुमताने निवडून येणार असेच बोलले जात आहे.

Leave a comment

0.0/5