लोकसभा निवडणुकीला सर्वत्र सभा घेऊन महायुतीचा कडाडून विरोध करणाऱ्या आणि महाआघाडीला मदत होईल अशी भूमिका मांडणाऱ्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या बद्दल जेव्हा काँग्रेसचे मुंबई पश्चिमचे उमेदवार तथा राज ठाकरे यांचे कट्टर वैरी समजले जाणारे संजय निरुपम यांना राज ठाकरे यांच्या सभे बद्दल विचारल्यावर मला इरिटेड करू नका असे उत्तर देऊन पुढे निघून गेले. कोण कुठे सभा घेईल हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. जे लोक मोदी सरकारला पाडायचा संकल्प करतायेत त्यांनी आघाडीला सहयोग दिला पाहिजे, असे सुद्धा निरुपम यांनी बोलून दाखविले.
आज राज ठाकरे घेत असलेल्या सभांचा फायदा हा काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षाला होता असला तरी त्याच महाआघाडीचा काँग्रेस उमेदवार राज ठाकरे यांचा अपमान करत असेल तर मनसे कार्यकर्ते कसे काय काँग्रेस-राष्ट्रवादी पक्षाचा प्रचार करू शकतात हा प्रश्न आज प्रत्येक मनसैनिकांना पडलेला असेलच आणि पडलाच पाहिजे. आज राज ठाकरे काँग्रेसच्या विरोधकांना मदत करून सुद्धा जर काँग्रेस नेते राज ठाकरे यांचा अपमान करत असेल तर हे मनसे सैनिक कसे काय खपवून घेत असतील. आज राज ठाकरे यांना खालच्या पातळीची भाषा वापरणाऱ्या निरुपम यांच्या पक्षाच्या इतर उमेदवारांचा प्रचार करताना काँग्रेस-राष्ट्रवादी कार्यकर्त्यांचे टोमणे सुद्धा मनसे सैनिक जरूरच ऐकत असतील यावर मनसे सैनिकांची भूमिका निर्णयांत्मक असणार हे सुद्धा नाकारता येत नाही