Skip to content Skip to footer

राज तुम्ही करून नका नखरे, बाळासाहेबांचे खरे वारस उद्धव ठाकरे – रामदास आठवले

,. सध्या निवडणुकीच्या काळात आपल्या कवितेच्या माध्यमातून विरोधांवर जोरदार टीका करताना आठवले दिसत आहे. मुंबईत काल झालेल्या एका सभेमध्ये आठवलेंनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंवर कवितेच्या माध्यमातून टिका केली. ‘राज तुम्ही करू नका जास्त नखरे कारण बाळासाहेबांचे खरे वारस आहेत उद्धव ठाकरे’ अशी कविता करत आठवलेंनी राज यांच्यावर निशाणा साधला.

भाजपावर आपल्या भाषणांमधून निशाणा साधणाऱ्या राज यांच्यावर आठवले यांनी टिका केली. ‘पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विरोधात आधीच ५६ विरोधक एकत्र आले असून त्यात आता ५७ नंबरला राज ठाकरे आले तरीही काही फरक पडणार नाही’ असे आठवले म्हणाले. राज ठाकरेंकडे सभेला गर्दी करण्याची ताकद आहे पण उमेदवार निवडूण आणण्याची ताकद आमच्याकडे असल्याचे आठवले यावेळी म्हणाले. राज ठाकरेंनी आधी मोदींच्या बाजूने बोलत होते याची आठवण आठवलेंनी आपल्या भाषणातून करुन दिली. ‘राज ठाकरे आठ दिवस गुजरात मधील विकासकामे पाहण्यासाठी राज यांनी आठ दिवसांचा दौरा केला होता. महाराष्ट्र सरकारने गुजरात सरकारची भूमिका स्वीकारावी असंही राज त्यावेळी म्हणाले होते. मात्र हेच राज ठाकरे आज मोदींवर टीका करत आहे. यावर राज ठाकरे यांना आपल्या कवितेच्या माध्यमातून टोमणा मारला.\

“राष्ट्रवादी – काँग्रेस सोबत गेले आहेत राज…
म्हणुनच इथे आलो आहे मी आज..
कारण मला जिरवायचा आहे महाआघाडीचा माज…”

Leave a comment

0.0/5