पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी राज्यातील लोकांना ‘जय श्री राम’ म्हणू देत नाहीत. मला आश्चर्य वाटत आहे की, प्रभू श्री रामाचे नाव भारतात घ्यायचे नाही तर मग पाकिस्तानात घ्यायचे काय, असा सवाल भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी केला. घताल, केशियारी आणि बिओष्णूपूर येथे झालेल्या सभेत त्यांनी ममता बॅनर्जींवर जोरदार टीका केली. पश्चिम बंगालमधील निवडणूक ही लोकशाहीच्या पुनरुज्जीवनासाठी असून भाजप येथे ४२ पैकी २३ हून अधिक जागा जिंकेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
पुढे म्हणाले, प्रभू राम हे भारतीय संस्कृतीचा भाग आहेत. त्यांच्या नामाचा जप करण्यापासून कुणीही भारतीयांना थांबवू शकत नाही. मला ममतांना विचारायचे आहे की, भारतात जर श्रीरामांचे नाव नाही घ्यायचे तर पाकिस्तानात घ्यायचे का? हा पश्चिम बंगाल आहे, पाकिस्तान नाही. मी बिश्णूपूरमधून कोलकाताला चाललो आहे. त्यांच्यात दम असेल तर मला तुरुंगात टाका. मोदींच्या गरुवारी होणार्या दोन रॅलींना ममतांनी परवानगी नाकारली. अशा पद्धतीने तुम्ही तुमचा पराभव रोखू शकता का?
मोदी सरकारने बंगाल सरकारला४,२८,८०० कोटी रुपये पाच वर्षांत दिले. पण, ते लोकांपर्यंत पोहोचलेले नाहीत. बांगलादेशमधील अनधिकृत स्थलांतरितांच्या हकालपट्टीसाठीच भाजप राष्ट्रीय ग्राहक नोंदणी कायदा बंगालमध्ये राबवणार आहे. असे ही पुढे ते म्हणाले.