पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजधानी दिल्लीत रामलीला मैदानावर प्रचार सभा घेतली. देश बदलायला आले आणि स्वत: बदलले, अशा शब्दात त्यांनी दिल्लीतील केजरीवाल सराकरवर निशाणा साधला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, देश बदलायला आले आणि स्वत: बदलून गेले. अव्यवस्थेचे दुसरे नाव अशी ओळख नवीन व्यवस्था निर्माण करणार्यांची झाली आहे. यावेळी नाकामपंथी मॉडेल असा केजरीवाल सरकारचा उल्लेख पंतप्रधान मोदी यांनी केला.
नाकामपंथी मॉडेल असा केजरीवाल सरकारचा उल्लेख करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, भारतात वेगवेगळ्या चार राजकीय परंपरा आहेत. त्यामध्ये नामपंथी, वामपंथी, दाम आणि दमन पंथी व विकासपंथी यांचा समावेश होतो. दिल्लीकरांनी मात्र नाकामपंथी हे पाचवे मॉडेल अनुभवले आहे. हे पाचवे मॉडेल दिल्लीच्या विकासाबाबतीत जे काम असेल त्याला नकार देते व जे काम करायचा प्रयत्न करतात त्यात अपयशी ठरतात, अशा शब्दात पंतप्रधान मोदी यांनी नाकामपंथी मॉडेल म्हणून केजरीवाल सरकारवर टीकेची झोड उठवली आहे.